पाऊस लांबल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली, पिकं वाचवण्यासाठी धडपड सुरु, आर्थिक फटका बसण्याची भीती

चेतन व्यास

| Edited By: |

Updated on: Aug 16, 2021 | 12:20 PM

सध्या जिल्ह्यातील विविध भागांत कोळपणी, डवरणीच्या कामाला गती दिली जात आहे, असे असले तरी मागील पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पाऊस लांबल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली, पिकं वाचवण्यासाठी धडपड सुरु, आर्थिक फटका बसण्याची भीती
वर्धा सोयाबीन
Follow us

वर्धा: महाराष्ट्रात यंदाच्या मान्सूनच्या पावसाचं वितरण असमान राहिल्याचं दिसून येत आहे. एकीकडे पश्चि महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरला पुराचा फटका बसलाय. तर राज्यातील इतर भागातील धरणांमध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा आहे. मध्यंतरी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. तर, सध्या जिल्ह्यातील विविध भागांत कोळपणी, डवरणीच्या कामाला गती दिली जात आहे, असे असले तरी मागील पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पावसानं दडी मारल्यानं सध्याच्या पीक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशी तर तुरीचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील महिन्यात दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील विविध भागांत थांबून थांबून पावसाच्या सरी बरसल्या तर त्यानंतर पाऊसच बेपत्ता झाल्याने, तसेच सध्या ऊनही तापत असल्याने पिकं माना टाकत असून पिकांची वाढ खुंटली आहे.

सर्वाधिक कापसाची पेरणी

जिल्ह्यात खरिप हंगामासाठी 4 लाख 48 हजार 756 हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते .यंदा सर्वाधिक 2 लाख 33 हजार 77 हेक्टरवर कापूस पिकांचा पेरा आहे तर 1 लाख 13 हजार 833 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.पावसाने सध्या दडी दिली आहे यामुळे काही पिकांना फटका बसू शकतो.

पावसानं दडी मारल्यानं चिंता वाढली

देवळी तालुक्याच्या मलकापूर येथील शेतकरी चंद्रकांत मोरे यांनी सात एकर शेतात कपाशी पिकाची लागवड केलीय.यंदा सोयाबीनच बियांण महाग असल्याने त्यांनी कपाशीला पसंती दिली. सुरुवातीला पावसाची दमदार हजेरी असल्याने शेतकरी आनंदीत होते. मात्र, आता पावसाच्या दडीने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. लवकर पावसाच्या सरी बरसल्या नाही तर पीक हातातून जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शेतकऱ्याने पेरणी केली मात्र तो अंदाज फोल ठरला. आता हे शेतकरी आपलं पीक वाचविण्यासाठी धडपड करत आहेत.

शेतकऱ्यांननी पिकांची वाढ खुंटल्याने खत दिले मात्र तरीसुद्धा पिकांची परिस्थिती दयनीय आहे. सध्या पिकांना वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.अशातच कृषी विभाग कोणत्याही प्रकारचा सल्ला देत नसून शेतीकडे पाहणी सुद्धा करत नसल्याची ओरड आहे, असा आरोप शेतकरी करत आहेत. सुरुवातीला समाधानकारक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलीय.मात्र, आता पावसाने दगा दिल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

इतर बातम्या:

Weather Update: मान्सून सक्रिय होतोय; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

परभणीच्या शेतकऱ्यांची पुण्यात धडक, पीक विमा प्रश्नी आक्रमक, 3 हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी

Wardha farmers waiting for monsoon rain due for save crops of Kharip like Cotton and Soybean

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI