भाजपची सत्ता किती राज्यात? ताकद घटलीय? शरद पवार यांनी आकडाच सांगत केलं मोठं विधान

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. पवार यांनी यावेळी मीडियाशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

भाजपची सत्ता किती राज्यात? ताकद घटलीय? शरद पवार यांनी आकडाच सांगत केलं मोठं विधान
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 1:34 PM

पंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. शरद पवार आज सोलापुरात आले. सोलापुरात एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पंढरपुरात आले. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचं किती राज्यात अस्तित्व आहे याचा आकडाच सांगितला. तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काय घडेल याचं भाकीतही त्यांनी केलं.

हरयाणात भाजप नाही, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, पश्चिम बंगालमध्ये भाजप नाही. संपूर्ण देशाचा नकाशा पुढे ठेवला तर फक्त पाच ते सहा राज्यात भाजप आहे. बाकी सर्व ठिकाणी नॉन भाजप आहे. देशभरात भाजपची घसरण सुरू आहे. आता लोकसभेत काय होईल हे सांगू शकणार नाही. पण लोकसभा आणि विधानसभा एकत्र होईल का? याचा निकाल आज सांगता येत नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

कर्नाटकात काँग्रेसच

कर्नाटकात भाजपची सत्ता येणार नाही. काँग्रेसची सत्ता येईल, असा दावाही त्यांनी केला. सुप्रिया सुळेंना सात वेळा संसदपटू पुरस्कार दिला आहे. आता हे आठवी वेळ आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. सुप्रिया सुळे यांच्यावर इतर कोणताही जबाबदारी देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एका वर्षात लोकसभेची निवडणूक आहे. तोपर्यंत आम्ही कोणतीही जबाबदारी घेणार नाही. फक्त मतदारांची जबाबदारी घेऊ असं सुप्रिया सुळे यांनीच सांगितलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पोरासोरांवर मी काय बोलावं?

संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यावर शरद पवार यांना विचारण्यात आलं. सीरिअस बोलण्यासाठी ज्यांचा लौकीक आहे. त्यावर मी बोललं पाहिजे. त्याबद्दल मला विचारा. पोरासोरांच्या विधानावर मी काय बोलावं? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

सरकारचं धोरण योग्य नाही

सरकार शेतकऱ्यांसोबत असतं तर शेतकऱ्याची ही अवस्था झाली नसती. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला चांगली किंमत आहे. पण इथे ऊस आणि साखरेची निर्यात होत नाही. सरकारची शेतीबाबत योग्य नीती नाही, असंही ते म्हणाले.

धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?
'हीच आमची इच्छा होती..', बीडच्या पालकमंत्रीपदावर काय म्हणाले सुरेश धस?.
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?
सैफच्या हल्लेखोराला बेड्या; बघा आरोपीच्या अटकेचा थरार, कसा घेतला शोध?.