ओबीसी आरक्षणासाठी जळगावात खासदार रक्षा खडसेंच्या नेतृत्वात भाजपचं आंदोलन, तर रोहिणी खडसेंचं विरोधात्मक ट्विट

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात जळगावात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. तर रोहिणी खडसे यांनी या आंदोलनावरुन देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला (BJP MP Raksha Khadse support BJP protest and Rohini Khadse slams Devendra Fadnavis).

ओबीसी आरक्षणासाठी जळगावात खासदार रक्षा खडसेंच्या नेतृत्वात भाजपचं आंदोलन, तर रोहिणी खडसेंचं विरोधात्मक ट्विट
रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 8:27 PM

जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने राज्य सरकारच्या विरोधात भाजपने आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. जळगावात भाजप खासदार रक्षा खडसेंच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजता जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संतप्त भावना व्यक्त केल्या. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली (BJP MP Raksha Khadse support BJP protest and Rohini Khadse slams Devendra Fadnavis).

रक्षा खडसे नेमकं काय म्हणाल्या?

“ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज भाजपकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. याबाबत आम्ही राज्य सरकारला पूर्वकल्पना दिली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. ओबीसी असो किंवा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय असो, राज्य सरकारची मानसिकताच नाही. राज्य सरकारने न्यायालयाने पुरावे सादर करून ओबीसींचे आरक्षण टिकवणे अपेक्षित होते. पण राज्य सरकारने काहीही न केल्याने आज आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली आहे”, असं खासदार रक्षा खडसे म्हणाल्या. या आंदोलनात भाजप खासदार रक्षा खडसे, आमदार यांच्यासह नगरसेवक, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते (BJP MP Raksha Khadse support BJP protest and Rohini Khadse slams Devendra Fadnavis).

रोहिणी खडसेंचं विरोधात्मक ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे सून रक्षा खडसे यांनी भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दिला. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या मुलगी रोहिणी खडसे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवर नाव न घेता टोला लगावला. “ते आंदोलन करताना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना”, असा सवाल रोहिणी खडसे यांनी ट्विटरवर भाजपला विचारला.

रोहिणी यांचा फडणवीसांना सवाल

इतकंच नाही तर रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला आहे. “आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर 1/8/2019 रोजी तसेच दि. 18/9/2019 रोजी राज्य सरकारकडून केंद्राकडे इंपिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही. खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारा केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाही, हे तुम्हाला माहित व्हायला हवे होते” असं रोहिणी खडसेंनी ट्विट केलं आहे.

संबंधित बातमी :

खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या OBC नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? रोहिणी खडसेंचा सवाल

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.