AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलडाण्यात मंदिर, महाविद्यालयांवर बंधनं कायम, वाचा काय सुरु, काय बंद राहणार?

मागील 24 तासात बुलडाणा जिल्ह्यात 30 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे (Buldhana Corona situation under control latest update of all new unlock rules)

बुलडाण्यात मंदिर, महाविद्यालयांवर बंधनं कायम, वाचा काय सुरु, काय बंद राहणार?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 12:00 AM
Share

बुलडाणा : मागील 24 तासात बुलडाणा जिल्ह्यात 30 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 85 हजार 953 कोरोनाबधित रुग्ण आढळले 84 हजार 996 कोरोनाबधित रुग्णांना उपचारानंतर सुटी दिली. सध्या जिल्ह्यात 310 एक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत 647 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुलडाणा जिल्हा प्रथम श्रेणीत आहे, त्यामुळे 14 जून पासून निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत (Buldhana Corona situation under control latest update of all new unlock rules).

सोमवारपासून काय सुरु असेल?

1. सर्व अत्यावश्यक सेवेची तसेच अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने नियमित सुरू राहतील. 2. मॉल, थिएटर्स आणि नाट्य गृह एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. 3. कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने, कृषि प्रक्रिया, उद्योग गृहे, शेती अवजारे व शेतातील उत्पादनाशी निगडीत दुकाने नियमित सुरू राहतील. 4. हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खानावळ नियमितपणे सुरू राहतील. 5. सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदान, फिरणे व सायकलिंगसाठी परवानगी असेल. 6. क्रीडा स्पर्धा नियमित भरवता येतील. 7. सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ 50 टक्के क्षमतेने घेता येतील. 8. सर्व केशकर्तनालये, सलुन, स्पा, ब्युटी पार्लर नियमित सुरू राहतील. 9. लग्न समारंभ, बँड पथक, कॅटरिंग आदींसह 50 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. 10. अंत्यसंस्काराला 50 व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी असेल. 11. सभा, बैठका आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीमध्ये घेता येतील. 12. बांधकाम नियमित रीत्या सुरू राहतील. 13. ई कॉमर्स व वस्तू सेवा नियमितपणे सुरू राहतील. 14. सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेसह सुरू राहील. 15. शासकीय व सर्व प्रकारची खाजगी कार्यालये 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

काय बंद असणार ?

1. मंदिर बंद, प्रार्थना स्थळे बंद असणार 2. कोचिंग क्लासेस आणि महाविद्यलय बंद असणार

(Buldhana Corona situation under control latest update of all new unlock rules).

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.