Chalisgaon Flood: चाळीसगावात पावसाचा पुन्हा कहर, तितुर डोंगरीला पुन्हा पूर, सतर्कतेचा इशारा

चाळीसगावमधील तितुर डोंगरी नदीच्या उगमस्थानावर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तितुर नदीला मोठा पूर आला. परिणामी चाळीसगाव शहरातील दोन्ही पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

Chalisgaon Flood: चाळीसगावात पावसाचा पुन्हा कहर, तितुर डोंगरीला पुन्हा पूर, सतर्कतेचा इशारा
चाळीसगाव पूर


मोतीलाल अहिरे, टीव्ही 9 मराठी, चाळीसगाव, जळगाव: चाळीसगावमधील तितुर डोंगरी नदीच्या उगमस्थानावर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तितुर नदीला मोठा पूर आला. परिणामी चाळीसगाव शहरातील दोन्ही पुलांवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जुन्या गावातून नव्या गावाकडे येण्यासाठी शहरातील नागरिकांना आठ कि.मी. ची फेरी मारून यावं लागत आहे. नदीची पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याबरोबरच नदीकाठावर घरे असलेल्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे महिन्याभरात तिसऱ्यांदा नदीला मोठा पूर आल्याने व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. दुकानात नवीन माल भरावा की नाही. असा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे.

बँका, व्यापाऱ्याचं नुकसान

चाळीसगाव शहरातील ॲक्सिस बँक अद्याप सावरलेली नाही आठ दिवसात दोन वेळा अॅक्सिस बँक तळमजल्यात पाणी शिरल्याने बँकेचे मोठे नुकसान झालं आहे. व्यवहार सुरळीत झालेले नाहीत पुन्हा पाणी भरल्यास बँकेच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाजी घाटावरील व्यावसायिकांनी आपल्या मालाची आवरा आवर केल्याने त्यांना कमी प्रमाणात नुकसानीला सामोरं जावे लागेल. मात्र, पुराचे पाणी आणखी वाढल्यास त्यांचं पुन्हा मोठ नुकसान होईल.

तितुर डोंगरी नदीवरील धरणे भरली आहेत त्यामुळे चाळीसगावला पुराचा फटका बसत आहे. आज पुन्हा नदीची जळपातळी वाढल्यास शहरात नदीकाठची कुटुंबीय,आणि दुकाने असलेल्या व्यावसायिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल.

गुलाब चक्रीवादळाचा महाराष्ट्रातही परिणाम जाणवणार

बंगालच्या उपनगरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, ते तीव्रता होऊन आता चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. आज ते ओरिसा किनारपट्टीवर आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण बघायला मिळेल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सोमवारी 27 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोबतच इंडिरियरमध्ये वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये 26, 27, 28 सप्टेंबरला वाऱ्यांचा वेग वाढलेला असेल. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा मुख्य परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि कोकणामध्ये याचा परिणाम अधइक दिसण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शुभांगी भूते यांनी सांगितले.

इतर बातम्या:

Cyclone Gulab: गुलाब चक्रीवादळाचं संकट वाढतंय, आंध्र प्रदेशसह ओडिशा किनारपट्टीला हाय अ‌लर्ट, महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

VIDEO | चंद्रकांतदादांवर राऊतांचा सव्वा रुपयाचा दावा, पत्रकाराच्या प्रश्नानंतर उदयनराजेंनी थेट बुकेच दिला!

 

Chalisgaon Flood Update Titur Dongari river flooded issue alert for people by administration

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI