VIDEO | चंद्रकांतदादांवर राऊतांचा सव्वा रुपयाचा दावा, पत्रकाराच्या प्रश्नानंतर उदयनराजेंनी थेट बुकेच दिला!

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांबाबत मुलाखत सुरु होती. त्यानंतर एका पत्रकाराने संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयाचा दावा ठोकणार असल्याबाबत प्रश्न विचारला.

VIDEO | चंद्रकांतदादांवर राऊतांचा सव्वा रुपयाचा दावा, पत्रकाराच्या प्रश्नानंतर उदयनराजेंनी थेट बुकेच दिला!
उदयनराजेंनी पत्रकाराला पुष्पगुच्छ दिला


सातारा : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) कधी काय करतील, याचा नेम नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सव्वा रुपयाचा दावा ठोकणार असल्याच्या वृत्ताबाबत एका पत्रकाराने उदयनराजेंना प्रश्न विचारला. त्यावर त्यांची प्रतिक्रिया सर्वांना चकित करणारी तर होतीच, मात्र उपस्थितांची हसून पुरेवाटही झाली.

नेमकं काय घडलं?

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांबाबत मुलाखत सुरु होती. त्यानंतर एका पत्रकाराने संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयाचा दावा ठोकणार असल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उदयनराजेंनी गाडीतील बुके काढून पत्रकाराला देत त्याचा सत्कार केला. “तुम्ही अत्यंत संयमाने मला साथ दिलीत, त्याबद्दल माझ्या वतीने आपल्या सर्वांना हा पुष्पगुच्छ” असं उदयनराजे म्हणाले. यावेळी सर्व पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

पाहा व्हिडीओ :

सव्वा रुपयाचं प्रकरण काय?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दैनिक ‘सामना’ला पत्र पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. राऊत यांनी हे आरोप दळभद्री असल्याचं सांगत चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा लावणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. चंद्रकांतदादा हे सव्वा रुपयावालेच आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला होता

सव्वा रुपयाच्या दाव्यावरुन चंद्रकांत पाटलांचा चिमटा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. ते माझे मित्र आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सुचवेन. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. राजकारणात एकमेकांवर बोलावं लागतं. आपण हिंदू संस्कृतीचे वाहक आहोत. चिमटा काढला तरी जखम होऊ देत नाही. मीही चिमटा काढला तरी जखम होऊ देत नाही. त्यांच्या मानहानीची किंमत त्यांनी ठरवावी, असंही ते म्हणाले होते.

संजय राऊतांचं उत्तर

“आत्मसन्मानाची गोष्ट असते, त्यामुळे किंमत काही असो तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही. तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहात” अशी प्रतिक्रिया त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली होती.

संबंधित बातम्या :

चंद्रकांत पाटलांचे आरोप दळभद्री, चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा करणार: संजय राऊत

Chandrakant Patil | संजय राऊतांनी सव्वा रुपयांच्या दाव्याची किंमत वाढवावी:चंद्रकांत पाटील

सव्वा रुपया असो की सव्वा कोटी, आत्मसन्मान महत्त्वाचा, मानहानीच्या दाव्यावरुन संजय राऊतांचं उत्तर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI