AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेसोबतच या देशाचा मी कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष… डोनाल्ड ट्रम्प यांची जगाची झोप उडवणारी घोषणा, थेट…

डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलतील याचा अजिबातच नेम नाही. नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळ उडवणारी घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मन किती जास्त काळे आहे, हे यावरून पुढे आले.

अमेरिकेसोबतच या देशाचा मी कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष... डोनाल्ड ट्रम्प यांची जगाची झोप उडवणारी घोषणा, थेट...
Donald Trump
| Updated on: Jan 12, 2026 | 10:14 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट केली आणि जगात एकच खळबळ उडाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध चर्चा रंगताना दिसल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले हे कृत्य नक्कीच अनेकांसाठी धक्कादायक ठरले. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर त्यांच्या मनात नेमके काय होते जगापुढे आले. वेनेजुएला आणि अमेरिकेतील तणाव सुरूवातीच्या काळात चांगलाच वाढताना दिसला. अमेरिका वेनेजुएलावर अंमली पदार्थाच्या तस्करीचा आरोप करत हल्ले करत होती. शेवटी वेनेजुएलावर हल्ला करत त्यांच्या अध्यक्षांना अटक करत अमेरिकेत आणले. वेनेजुएलाचे अध्यक्ष मादुरो अमेरिकेच्या ताब्यात असून त्यांच्यावर खटला सुरू आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा दावा केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या फोटोसह पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्यांनी स्वत:चा उल्लेख वेनेजुएलाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून केला. ज्यानंतर खळबळ उडाली. मुळात म्हणजे सुरूवातीला सांगितले जात होते की, डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये वेनेजुएलाचे तेल हवे होते. ज्यावर त्यांनी अगोदरत कब्जा मिळवला. वेनेजुएलाचे तेल ते जगभरात विकणार आहेत. मात्र, आता स्पष्ट झाले की, त्यांची नजर फक्त तेलावरच नव्हती तर थेट वेनेजुएलावर आहे.

वेनेजुएलाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून त्यांनी स्वत:चा उल्लेख केल्याने जगात मोठी खळबळ उडाली असून वेनेजुएला अध्यक्ष मादुरो यांना त्यांनी अटक केली आणि वेनेजुएलावर ताबा मिळवला. शिवाय त्यांचे पोट फक्त अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून भरले नाही तर त्यांना वेनेजुएलाचे अध्यक्षपदही हवे आहे. वेनेजुएलाच्या राजकीय गोष्टींमध्ये आपण हस्तक्षेप करणार नसल्याचे काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. मात्र, आता त्यांच्या मनातील खरी गोष्ट जगापुढे आली.

Donald Trump

पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:चा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष आणि डोनाल्ड वेनेजुएलाचे कार्यवाहक अध्यक्ष यासोबतच्या या पोस्टमध्ये त्यांचा एक फोटोही दिसत आहे. वेनेजुएलावर मोठी लष्कर कारवाई करत त्यांनी वेनेजुएलावर ताबा मिळवला. मात्र, कोणीही विचार केला नव्हता की, डोनाल्ड ट्रम्प स्वत:वेनेजुएलाचे अध्यक्ष म्हणून घेतील.

प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रोम्बासोम्बा डान्स, काय म्हणाले उद्धव ठाकरे
प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा रोम्बासोम्बा डान्स, काय म्हणाले उद्धव ठाकरे.
'उद्या वीज बंद केली तर...,' राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती...
'उद्या वीज बंद केली तर...,' राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती....
कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल...काय म्हणाले राज ठाकरे ?
कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल...काय म्हणाले राज ठाकरे ?.
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल.
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल.
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला.
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा.
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल.
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल.
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज.