भाजप, हर्षवर्धन पाटील आणि ‘गटारगंगा’, चंद्रकांत पाटलांनी पळवापळवीची कुंडली मांडली

राजकारणामध्ये सत्ता ज्याच्या हातामध्ये तिजोरीची किल्ली जाते. त्यामुळे ती सत्ता मिळवल्याशिवाय तुम्हाला सत्तेच्या माध्यमातून विकास करता येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या काही गोष्टी चालतात.

भाजप, हर्षवर्धन पाटील आणि 'गटारगंगा', चंद्रकांत पाटलांनी पळवापळवीची कुंडली मांडली
भाजप, हर्षवर्धन पाटील आणि 'गटारगंगा', चंद्रकांत पाटलांनी पळवापळवीची कुंडली मांडली

कोल्हापूर : शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत आज मुंबईत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीतून भाजपने गेलेले हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. यानंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या पळवापळवीची कुंडली मांडली. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं पंढरपूरला आणि देगलूरला उमेदवार बाहेरुन आणावा लागला. तुमची जरा यादी वाचा अब्दुल सत्तार कुठून आले? सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजपचे आमदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर तुम्ही चक्क त्यांचा मुलगा पळवला, अशी बोलत चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे. (Chandrakant Patil’s criticism of Uddhav Thackeray from Harshvardhan Patel)

चिंतामण वनगांच्या मुलाचा पराभव झाला तो भाग वेगळा. लोकांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे सहानुभूतीची लाट चिंतामण वनगाच्या मुलाच्या सोबत असूनही तो निवडणुकीत पडला. तिथे आम्ही वळवींना निवडून आणलं ती जागा पण तुम्ही भाजपकडून घेतली आणि सिटिंग आमदार वणगा पण घेतला. बाकी तुम्ही ज्या 164 जागा लढवल्या, त्यापैकी जवळपास 30-35 जागांवर तुम्ही शिवसेनेला जागा घेतल्या आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार घेतला. मग इकडे वाळव्यामध्ये तुम्ही गौरव नाईकवडेला घेतलं, तिकडे कराडला धैर्यशीलला घेतलं. कोरेगावला महेश शिंदेला घेतलं, अशी मोठी यादी आहे ज्याच्यामध्ये जागा शिवसेनेच्या आणि उमेदवार भाजपचा. पण आम्ही कधी ते चुकीचं म्हटलं नाही.

सत्ता मिळवल्याशिवाय विकास करता येत नाही

राजकारणामध्ये सत्ता ज्याच्या हातामध्ये तिजोरीची किल्ली जाते. त्यामुळे ती सत्ता मिळवल्याशिवाय तुम्हाला सत्तेच्या माध्यमातून विकास करता येत नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या काही गोष्टी चालतात. 100 मध्ये 10 च पक्षाचे कार्यकर्ते आणि 90 बाहेरचे कार्यकर्ते तर ते आक्षेपार्ह असतं. तुम्ही हे जे अब्दुल सत्तार घेतले, महेश शिंदे घेतले, धैर्यशील घेतले, गौरव नाईकवडे घेतले, चिंतामण वनगांचा मुलगा घेतला, याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे. पण हे तुम्ही विसरलात. हर्षवर्धन पाटलांचं तेवढं लक्षात राहिलं, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

वाईट काळामध्ये सोबत असलेला आपला सहकारी तेव्हा चालत होता. हर्षवर्धन पाटील आज तुमच्यात आल्यानंतर एकदम पवित्र झाले. गटाराचं पाणी तुमच्यात टाकलं तर गंगा. तेच पाणी दुसरीकडे टाकलं तर गटारगंगा, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. (Chandrakant Patil’s criticism of Uddhav Thackeray from Harshvardhan Patel)

इतर बातम्या

केंद्राच्या लुडबुडीचा अतिरेक होतोय? उद्धव ठाकरे म्हणतात, आता सर्व राज्यांनी एकत्र येण्याची वेळ

भाजप, हर्षवर्धन पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणात ‘गटारगंगा’, उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI