AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दसऱ्यालाच त्यांनी शिमगा करुन टाकला, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. या टीकेवर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

दसऱ्यालाच त्यांनी शिमगा करुन टाकला, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया
दसऱ्यालाच त्यांनी शिमगा करुन टाकला, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया
| Edited By: Chetan Patil | Updated on: Oct 15, 2021 | 9:05 PM
Share

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. या टीकेवर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्याच दिवशी शिमगा करुन टाकला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी फक्त भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली. पण राज्यातील महिला अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ते काहीच बोलले नाहीत, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

“दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख अशी दोन्ही पदं एकाच ठिकाणी असलेले उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकल्यानंतर शिमगा अजून लांब आहे हे त्यांच्या लक्षात न आल्यामुळे, दसऱ्यालाच त्यांनी शिमगा करुन टाकला. संपूर्ण भाषण अतिशय लक्षपूर्ण ऐकताना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ते बोलत जरी असले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रश्नांवर हात घालतील अशी आशा होती”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

‘फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना महाविकास आघाडीपेक्षा जास्त मदत केली’

“महाराष्ट्रातील महिला अत्याचार वाढत चालले आहेत त्यामध्ये नेमकं काय करणार आहेत? कायदा पेंडिंग आहे. दिशा कायदा लवकर करुन टाका. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा आक्रोश सुरु आहे. त्यावर तुम्ही काय करणार आहात? दहा हजार कोटींची फोड मांडाना. रस्ते दुरुस्त करणं, धरणं सुरक्षित करणं यासाठी तुम्ही पैसे दिले असतील तर त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा आहे? शेतकऱ्याला तुम्ही दहा हजार रुपये हेक्टर दिले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात 20400 रुपये हेक्टर आणि बागायतीला 54000 रुपये हेक्टर दिले होते, ज्याला तुम्ही 25 हजार दिलेत त्यांना देवेंद्रजींनी 75 हजार रुपये हेक्टर दिले आहेत”, असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला.

‘ड्रग्ज प्रकरणाचं तर गांभीर्यच नाही’

“महाराष्ट्रात दोन वादळ आले, अतिवृष्टी झाली, महिलांवर अत्यातार झाला. मोठ्या प्रमाणात समोर येणारं ड्रग्ज प्रकरण, त्याबाबतही चिमूटभर गांजा तुम्ही म्हणत आहात. याचा अर्थ गांभीर्यच नाही. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी त्यांना कदाचित लवकर शिमगा आला असं वाटल्याने आज जेवढा म्हणून केंद्र आणि भाजपच्या नावाने शिमगा करता येईल तेवढा शिमगा त्यांनी केला”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

हेही वाचा :

मोठ्या भावाविरोधात ठाकरेंनी रणशिंग फुंकलं? दसऱ्याच्या भाषणात ड्रग्ज, अदानी, गांजा, निधीवर थेट मोदींना सवाल

VIDEO: सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली प्रकारच; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका