VIDEO: सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली प्रकारच; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

सध्या जो खेळ सुरु आहे वाट्टेल ते करायचं पण मला सत्ता पाहिजे. व्यसनाधीनता हा जो प्रकार आहे, अमली पदार्थ हा वेगळा प्रकार आहे. त्याचा नायनाट केलाच पाहिजे. (cm uddhav thackeray attacks bjp over various issues)

VIDEO: सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली प्रकारच; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
cm uddhav thackeray


मुंबई: सध्या जो खेळ सुरु आहे वाट्टेल ते करायचं पण मला सत्ता पाहिजे. व्यसनाधीनता हा जो प्रकार आहे, अमली पदार्थ हा वेगळा प्रकार आहे. त्याचा नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली प्रकारच आहे, असा घणाघाती हल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चढवला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. सध्या जो खेळ सुरु आहे वाट्टेल ते करायचं पण मला सत्ता पाहिजे. व्यसनाधीनता हा जो प्रकार आहे, अमली पदार्थ हा वेगळा प्रकार आहे. त्याचा नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली प्रकारच आहे. अगदी बाजार समित्यांपासून लोकसभेपर्यंत माझ्याच अमलाखाली पाहिजे हा सुद्धा एक अंमली प्रकारच आहे. या अमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार?, असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

हिंमत असेल तर अंगावर या

ही काय लायकीची माणसं आहेत, ते आपल्या अंगावर येत आहेत. आव्हान देत आहेत, हिंमत असेल तर अंगावर या. मी कशाला येऊ तुमच्या अंगावर? आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. पण कुणी आलं तर आम्ही सोडत नाही. आम्ही कशाला येऊ तुमच्या अंगावर? काय आहे तसं? लायकी तरी आहे का, पात्रता तरी आहे का? हीच शिकवण आम्हाला शिवरायांनी, शिवसेना प्रमुखांनी दिली आहे. पण अंगावर यायची भाषा करत असाल तर स्वत:मध्ये हिंमत आणि धमक असेल तर या. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून येऊ नका. समोरासमोर या, असा इशारा त्यांनी दिला.

आवाज दाबणारा जन्माला यायचाय

आजचा हा क्षण आपल्या आयुष्यात अत्यंत मोलाचा आहे. सुवर्ण क्षण आहे. शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेली परंपरा आपण पुढे नेत आहोत याचा अभिमान आहे. शस्त्र पूजन झाल्यानंतर खऱ्या शस्त्रांची पूजा केली. ही शस्त्रं म्हणजे तुम्ही आहात. मला कल्पना आहे बऱ्याच दिवसांनी आपल्याला वाव मिळाला आहे. आवाज आपला कुणी दाबू शकत नाही. आवाज दाबणारा जन्माला येऊ शकत नाही. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना दसरा आणि विजया दशमींच्या शुभेच्छा देतो. मलाही बरं वाटलं. कारण मला बऱ्याच दिवसांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि भगिनींनो आणि मातांनो अशी हाक देता आली, अशी सुरुवात त्यांनी भाषणाची केली.

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा

खोडायचे अनेकांनी प्रयत्न केले. पाडण्याचेही प्रयत्न केले. पण माझं आजही आव्हान आहे. पाडून दाखवा. पण त्यांना सरकार पाडता येत नाही म्हणून छापा की काटा सुरू आहे. छापाकाटा टाकायचा आणि काटा काढायचा अशी खेळी सुरू आहे. पण ही थेरं मी अधिक काळ चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. हर हर महादेव काय असतं हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये. पण आलीच तर दाखवावीच लागेल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणतायत मी गेलोच नाही, फडणवीसांच्या दुखऱ्या नशीवर ठाकरेंचं बोट

याला तर अक्करमाशीपणा म्हणतात, उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका

मोठ्या भावाविरोधात ठाकरेंनी रणशिंग फुंकलं? दसऱ्याच्या भाषणात ड्रग्ज, अदानी, गांजा, निधीवर थेट मोदींना सवाल

(cm uddhav thackeray attacks bjp over various issues)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI