Dapoli : कोरोना नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी नवनिर्वाचित आठ नगरसेवकांवर गुन्हे दाखल

Dapoli : कोरोना नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी नवनिर्वाचित आठ नगरसेवकांवर गुन्हे दाखल
कोरोना नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी नवनिर्वाचित आठ नगरसेवकांवर गुन्हे दाखल

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल सीआरपीसी 149 प्रमाणे नियमांचे उल्लंघन करू नये. याकरीता दापोली पोलीस ठाणेमार्फत दापोलीतील नगरपंचायत निवडणुकीतील उभे राहिलेल्या उमेदवारांना नोटीस देण्यात आलेली होती.

लक्ष्मीकांत घोणसे पाटील

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 25, 2022 | 2:40 AM

दापोली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोकणातील महत्त्वपूर्ण अशा दापोली नगरपंचायत (Dapoli Nagar Panchayat) सार्वत्रिक निवडणूक निकालाच्या वेळेस जमाव करून जल्लोष, घोषणाबाजी व मिरवणूक काढल्यामुळे नवनिर्वाचित आठ नगरसेवकांसह सुमारे दीडशे नागरिकांवर दापोली पोलिस ठाण्यात(Dapoli POlice Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाबतच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. खालीद अब्दुल्ला रखांगे, मेमन अरिफ गफुर, अन्वर अब्दुल गफुर रखांगे, संतोष दत्ताराम कलकुटके, विलास राजाराम शिगवण, मेहबूब कमरुद्दीन तळघरकर, रवींद्र गंगाराम क्षीरसागर, अजिम महमद चिपळुणकर अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या नगरसेवकांची नावे आहेत. (Charges filed against eight newly elected corporators for violating Corona rules)

कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत उमेदवारांना नोटिसा देण्यात आल्या होत्या

जिल्हाधिकारी यांच्याकडील आपती व्यवस्थापन कायद्याअन्वये पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्रौ. 11 वाजेपर्यंत बंदी आहे. त्या अनुषंगाने 19 जानेवारी रोजी झालेल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल सीआरपीसी 149 प्रमाणे नियमांचे उल्लंघन करू नये. याकरीता दापोली पोलीस ठाणेमार्फत दापोलीतील नगरपंचायत निवडणुकीतील उभे राहिलेल्या उमेदवारांना नोटीस देण्यात आलेली होती. तरीही दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल लागत असताना सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकालाची प्रक्रिया सुरू करून विजयी उमेदवारांचे नाव घोषित करण्यास सुरूवात केली.

मिरवणुकीचे सरकारी कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ शुटिंग केले

यावेळी दापोलीलीत राहणारे खालीद अब्दुल्ला रखांगे, मेमन अरिफ गफुर, अन्वर अब्दुल गफुर रखांगे, संतोष दत्ताराम कलकुटके, विलास राजाराम शिगवण, मेहबूब कमरुद्दीन तळघरकर, रवींद्र गंगाराम क्षीरसागर, अजिम महमद चिपळुणकर व इतर उमेदवार यांनी सुमारे 100 ते 150 कार्यकर्ते (सर्व रा. दापोली) असे लोक जमून निवडणूक विजयाचा जल्लोष करू लागले व घोषणाबाजी करु लागले. नेमण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्त अधिकारी व अंमलदार यांच्यामार्फत कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत समजावण्यात आले. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नेमण्यात आलेल्या बंदोबस्त अंमलदार यांच्यामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांनी व्हिडीओ शुटींग केले. जमाव करून दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणकीमध्ये विजयाचा उत्सव साजरा केला. याप्रकरणी दोपाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Charges filed against eight newly elected corporators for violating Corona rules)

इतर बातम्या

Mumbai High Court : यूपीएससीच्या पॅनेलचा निर्णय राज्य सरकारला बंधनकारक; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Jammu Kashmir : कश्मिरमध्ये 135 दहशतवादी घुसण्याच्या तयारीत, बीएसएफ अ‍ॅलर्ट मोडवर

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें