VIDEO | तरुणीने चक्क नखांवर साकारला शिवराज्याभिषेकचा नयनरम्य सोहळा

हजारो शिवप्रेमी नेहमीच अनोख्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन करण्याचा प्रयत्न करत असतात. (Chhatrapati Shivaji Maharaj shivrajyabhishek sohala Young Girl Greetings With Nail Art)

VIDEO | तरुणीने चक्क नखांवर साकारला शिवराज्याभिषेकचा नयनरम्य सोहळा
shivrajyabhishek nail art


सोलापूर : दरवर्षी 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शिवराज्याभिषेक दिन हा अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. यंदा किल्ले रायगडावर 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने हजारो शिवप्रेमी नेहमीच अनोख्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन करण्याचा प्रयत्न करत असतात. (Chhatrapati Shivaji Maharaj shivrajyabhishek sohala Young Girl Greetings With Nail Art)

याच पार्श्वभूमीवर सोलापूर येथील एका तरुणीने चक्क हाताच्या बोटांच्या नखांवर चित्रकलेतून शिवराज्याभिषेक सोहळा साकारला आहे . प्रणोती औदुंबर गोरे असे या तरुणीचे नाव आहे. सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराज, मुजरा करणारा मावळा, हाती अबदागिरी घेतलेले शिलेदार, मानदंड घेऊन उभा असलेले प्रधान असे प्रसन्न दृश्य तिने तिच्या नखांवर रेखाटले आहे. याद्वारे तिने तिची अनोखी शिवभक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

नखाच्या पृष्ठभागावर भव्य सोहळा

किल्ले रायगड येथील नयनरम्य सोहळा घरबसल्या अनुभवण्याचा उद्देश मनी ठेवून हर हर महादेव अशी गर्जना केली आहे. जवळपास 1.5 सेमी×1 सेमी इतक्या कमी नखाच्या पृष्ठभागावर भव्य सोहळा रंगांच्या माध्यमातून तिने हे दृश्य रेखाटले आहे. चित्रकार प्रणोती यांनी सादर केलेला हा कलाप्रकार छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो, असंच यातून भासत आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj shivrajyabhishek sohala Young Girl Greetings With Nail Art)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI