Video | ‘बंद करा रे धंदे तुमचे, काय तमाशा लावलाय,’ अमरावतीत अनिल बोंडे-पोलिसांत शाब्दिक चकमक
भारतीय जनता पार्टीने पुकारलेल्या एकदिवसीय बंदला गालबोट लागले. या बंददरम्यान, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून पोलिसांनीच आंदोलनाला गालबोट लावले, असा आरोप भाजपकडून केला जातोय.

अमरावती : भारतीय जनता पार्टीने पुकारलेल्या एकदिवसीय बंदला हिंसक वळण लागले. या बंददरम्यान, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून पोलिसांनीच आंदोलनाला गालबोट लावले, असा आरोप भाजपकडून केला जातोय.
माजी कृषी मंत्री अनिल बोंडे पोलिसांवर भडकले
अमरावती शहरात 12 नोव्हेंबर रोजी मुस्लीम समाजाने मोर्चाचे आयोजन केले होते. त्रिपुरा राज्यात मशीद जाळण्यााच्या कथित घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर भाजपने अमरावतीमध्ये एक दिवसीय बंदचे आवाहन केले होते. आजच्या अमरावती बंदलादेखील गालबोट लागले. अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करुन अश्रूधूरचा मारा केला. यामुळे भाजपचे नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे पोलिसांवर भडकले.
पाहा व्हिडीओ :
आंदोलन चिघळण्याला पोलीसच जबाबदार
बोंडे व पोलिसांमध्ये राजकमल चौकात शाब्दिक चकमक उडाली. पोलीस व अनिल बोडे यांच्यात बाचाबाची झाल्याने या ठिकाणी पुन्हा आंदोलनकर्ते व पोलीस आमने-सामने आले. या बाचाबाचीमुळे येथे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनिल बोंडे तसेच पोलिसांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. या पूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र, या अस्थिरतेला पूर्णपणे पोलीसच जबाबदार आहेत, असा आरोप भाजपने केलाय.
चार जिल्ह्यांतून पोलिसांची कुमक मागवली, जिल्ह्यांत इंटरनेटबंदी
दरम्यान, त्रिपुरा येथे मिशिदीवर हल्ला झाल्याचे कथित वृत्त वाऱ्यासारखे पसरले आहे. या वृत्तामुळे मुस्लीम समाजाने आयोजित केलेल्या मोर्चाला गालबोट लागले. त्यानंतर आता वातावरण चिघळले आहे. सलग दुसऱ्या दिवशी अमरावती शहर धुमसत आहे. सध्या परिस्थिती तणावाची आहे. मात्र भविष्यकालीन विचार करुन येथे पोलीस संरक्षण वाढवण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, वाशीम या जिल्ह्यांतून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आलीय. हिंसक जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच संपूर्ण जिल्ह्यात चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आलीय. विशेष म्हणजे सध्या येथे इंटरनेटची सुविधादेखील बंद करण्यात आलीय.
इतर बातम्या :
खुलेआम दंगलीवर कारवाई नाही, पोलिसांनी दंडुका उगारल्यास त्यांची मते जातील, चंद्रकांत पाटील यांची टीका
जाळपोळ, दगडफेकीनंतर अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण, चार जिल्ह्यातून पोलिसांची कुमक मागवली
महाज्योतीच्या वतीने विद्यार्थ्यांना टॅब वाटप; दीड वर्षापर्यंत दररोज मोफत 6 जीबी इंटरनेट डेटाहीhttps://t.co/j7i7gBQ2uH#Mahajyoti|#Nagpur|#Students|#Tab|#GuardianMinisterChhaganBhujbal
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2021
