AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधकांच्या पोटात नुसती आग, मैदानात उतरला ढाण्या वाघ; सभे आधीच खेडमध्ये शिवसेनेची पोस्टरबाजी

खेडच्या ज्या गोळीबार मैदानातून उद्धव ठाकरे यांनी सभा घेत मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. त्याच मैदानावर आज एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे. त्यामुळे शिंदे आता काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विरोधकांच्या पोटात नुसती आग, मैदानात उतरला ढाण्या वाघ; सभे आधीच खेडमध्ये शिवसेनेची पोस्टरबाजी
CM Eknath ShindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 19, 2023 | 3:37 PM
Share

खेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये आज सभा होणार आहे. या सभेची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. ही सभा कोकणातील रेकॉर्ड ब्रेक सभा असेल असं सांगितलं जात आहे. तसेच कोकणाला दिशा देणारीही ही सभा असेल असा दावा केला जात आहे. गोळीबार मैदानात होणाऱ्या या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करारा जवाब देणार असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे, पत्रकार परिषदांचे व्हिडीओ दाखवून या सभेतून उद्धव ठाकरे यांची पोलखोल केली जाणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या लाव रे तो व्हिडीओ सांगणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

खेड येथील गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. संध्याकाळी ही सभा होणार आहे. विशेष म्हणजे 5 मार्च रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. त्याच मैदानातून आज एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे, या सभेची प्रचंड वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. विरोधकांच्या पोटात नुसती आग, मैदानात उतरला ढाण्या वाघ, अशी रामदास कदम यांची पोस्टर्स लावण्यात आली आहे. त्यामुळे रामदास कदम यांची तोफही आज कोकणात धडाडताना दिसणार आहे.

उत्तर सभा

गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर याच मैदानात शिवसेनेची उत्तर सभा काही तासाने सुरू होणार आहे. सभेला गर्दी वाढवण्यासाठी शिवसेना सक्रिय झाली आहे. सभास्थळाचं वातावरण भगवमय झालं आहे. गोळीबार मैदान खुर्च्यांनी फुलले आहे. खेडमध्ये लोकांची मोठी गर्दी दिसत आहेत. सभेसाठी ही लोकं आल्याचं सांगितलं जात आहे. कोकणातील सर्वच खेड्यातून या सभेसाठी माणसं आणली जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

कोकणाला दिशा मिळेल

राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी या सभेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांची सभा ही काय कोणावर टीका करण्यासाठी होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकणाचा विकास आराखडा लोकांना सांगणार आहेत. कोकणाला दिशा देणारी ही सभा होणार आहे. ही ऐतिहासिक अशी सभा होणार आहे. सभेची वातावरण निर्मिती झाली आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं. भास्कर जाधव यांना टीका केल्याशिवाय काही काम उरलेले नाही. आपण उद्धव ठाकरेंचे खूप जवळचे कसे आहोत हे दाखवून देण्याकरता ते सातत्याने टीका करत असतात, असा टोला त्यांनी लगावला.

म्हणून ते विधान

सकाळी साडे नऊ वाजल्या पासून आम्हाला विरोधक शिव्या देतात. जनता त्यांना निवडणुकीत जागा दाखवले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हे वक्तव्य केलं आहे. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाला मानतो, असंही त्यांनी सांगितलं.

मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.