Akola Congress | महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

हिंदू नववर्षाच्या पर्वाला केंद्र सरकारने (Central Government) अवाजवी भाववाढ करून देशातील जनतेला महागाईची भेट दिली आहे त्याचा निषेध करतो असे म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नवीन बसस्थानक चौकात आंदोलन केले.

Akola Congress | महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन; केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी
इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना काँग्रेसचे पदाधिकारी. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 4:18 PM

अकोला : दिवसेंदिवस वाढणारी महागाई, इंधन दरवाढ यांच्या विरुद्ध महानगर काँग्रेसच्या (Mahanagar Congress) वतीने सोमवारी सकाळी नवीन बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे (Dr. Prashant Wankhade) यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत प्रचंड वाढलेल्या दरवाढीचा निषेध केला आहे. हिंदू नववर्षाच्या पर्वाला केंद्र सरकारने (Central Government) अवाजवी भाववाढ करून देशातील जनतेला महागाईची भेट दिली आहे त्याचा निषेध करतो असे म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नवीन बसस्थानक चौकात आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्याया विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. देशात महागाईने मागील काळातील उच्चांक गाठला आहे.

महागाईमुळं जनता त्रस्त असल्याचा आरोप

सर्वसामान्य नागरिक या वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतच चालले आहेत. परिणामी दळण वळणाचा खर्च वाढत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे सुद्धा भाव वाढले आहेत. या सर्व महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. 2014 मध्ये जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून मोदी सत्तेवर आले. मात्र मागील सात वर्षात महागाईचा आलेख बघितला तर नागरिक हे या अच्छे दिनाला त्रस्त झाले आहेत. आता नागरिक काँग्रेसच्या बाजूने उभी राहणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली आहे.

अमरावतीतही महागाईविरोधात आंदोलन

अमरावती जिल्ह्यातही मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे महागाई विरोधात आंदोलन केलं. अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडखे यांचा बॅनर वरून फोटो गायब झाला. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू होती.

Nitesh Rane: राऊतांसारख्या राष्ट्रवादीच्या भोंग्याला किती महत्त्व द्यायचं?; नितेश राणेंचा सवाल

Maharashtra News Live Update : नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा आवडता छंद, पर्यायी इंधन परिषदेत मुख्यमंत्री ठाकरेंचा संवाद

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.