AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Darshana Pawar Death Mystery : विटांचं जुनाट घर… ओस पडलेल्या घराला कुलूप; राहुल हंडोरे गेला कुठे?; दर्शना पवार प्रकरणाचं गूढ कायम

दर्शना पवार हिची हत्याच झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. तिचा मित्र राहुल हंडोरे गायब असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. राहुल पकडल्यानंतरच या हत्येचं गूढ उकललं जाणार आहे.

Darshana Pawar Death Mystery : विटांचं जुनाट घर... ओस पडलेल्या घराला कुलूप; राहुल हंडोरे गेला कुठे?; दर्शना पवार प्रकरणाचं गूढ कायम
Darshana Pawar MurderImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 22, 2023 | 7:28 AM
Share

नगर : एमपीएससीत तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार हिचा अचानक गूढ मृत्यू झालाय. आधी दर्शना आठ दिवस गायब झाली. त्यानंतर राजगडावर तिचा मृतदेह सापडला. सडलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तिचा मित्र राहुल हंडोरे या काळात तिच्या सोबत होता. तोही गायब झाल्याने या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. राहुल हंडोरे कुठे गेला? तो कुठे लपला तर नाही ना? की त्याचंही काही बरं वाईट झालंय? याचा पोलीस शोध घेत आहेत. जोपर्यंत राहुल सापडत नाही तोपर्यंत या प्रकरणाचं सत्य बाहेर येणार नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत आहेत.

दर्शना पवार हिची हत्या झाल्याचं पोस्टमार्टम अहवालातून उघड झालं आहे. राजगडावर ती ट्रेकिंगला गेली होती. तिथेच तिचा खून झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. तिच्यासोबत तिचे काही मित्र होते. राहुल हंडोरे हा मित्र सुद्धा तिच्यासोबत होता. पण तोही तेव्हा पासूनच गायब आहे. त्यामुळे या हत्येचा संशय त्याच्यावर बळावला आहे. पण राहुल गेला कुठे? असा सवाल केला जात आहे. राहुल लपून बसलाय की त्याचंही बरं वाईट झालंय? असा प्रश्न पोलिसांनाही पडला असून पोलीस त्या दिशेने शोध घेत आहेत.

घराला कुलूप

एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेली दर्शना पवार ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. तर राहुल हंडोरे हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा या गावचा आहे. तोही एमपीएससीची तयारी करत होता. शहा या गावात त्याचं विटांचं जुनाट घर आहे. या घराला कुलूप लावलेलं आहे. घर ओस पडलेलं आहे. घरात कुणीच नसल्याने त्याचे कुटुंबीय कुठे गेले? असा प्रश्नही केला जात आहे.

मराठा समाजाचा मोर्चा

दर्शनाच्या मृत्यूमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. दर्शनासारख्या अत्यंत हुशार मुलीचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दर्शनाला न्याय मिळावा म्हणून आता मराठा समाज मैदानात उतरला आहे. दर्शनाच्या हत्येच्या निषेधार्थ आज कोपरगाव शहरात सकल मराठा समाजाने मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाला शेकडो लोक उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कठोर शिक्षा करा

दर्शना हिच्या हत्येने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दर्शना खूप हुशार होती. भविष्यात ती काही तरी झाली असती. घराचा नावलौकीक तिने वाढवला असता. पण त्या आधीच तिची हत्या करण्यात आलीय. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे, असं दर्शनाचे मामा उत्तम आगळे यांनी केली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.