MPSC करणाऱ्या तरुणीचा वडिलांच्या पार्थिवाला खांदा, बहिष्कार टाकणाऱ्या जात पंचायतीला 7 बहिणींची चपराक

जातपंचायतीच्या जाचामुळे 7 बहिणींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आली. ही धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे.

MPSC करणाऱ्या तरुणीचा वडिलांच्या पार्थिवाला खांदा, बहिष्कार टाकणाऱ्या जात पंचायतीला 7 बहिणींची चपराक
Chandrapur jaat panchayat

चंद्रपूर : जातपंचायतीच्या जाचामुळे 7 बहिणींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आली. ही धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथील ही घटना आहे. या परिसरात राहणाऱ्या प्रकाश ओगले यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. प्रकाश ओगले यांच्या मृत्यूचा निरोप नातलगांना देण्यात आला, मात्र काही तासातच गेल्या 15 वर्षांपासून प्रकाश ओगले भोगत असलेला जात पंचायतीचा बहिष्कार पुन्हा एकदा आड आला. (Jaat Panchayat boycott at Chandrapur )

गोंधळी समाजाचा बहिष्कार

गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची. पदरी 7 मुली आणि 2 मुलं. त्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न, कार्यक्रम यांना जाणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. आर्थिक दंड लावला, मात्र प्रकाश ओगले यांनी दंड भरला नाही. त्यामुळे हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर ही कायम राहिला.

जात पंचायतीला सणसणीत चपराक

मात्र MPSC ची तयारी करणाऱ्या त्यांच्या जयश्री या मुलीने जात पंचायतीला सणसणीत चपराक लागावत, आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला. गोंधळी समाजाच्या जात पंचायतीच्या या जाचाविरूद्ध काही सामाजिक कार्यकर्ते लढा देत आहेत. त्यांच्या मते समाजातील गरिबांकडून पैसे लुबाडने, बहिष्कार टाकणे आणि त्यामाध्यमातून संपूर्ण समाजावर आपली दहशत बसविण्याचं काम जात पंचायत करते. सध्या विदर्भात 35 कुटुंबं अशा प्रकारचा जात पंचायतीचा बहिष्कार भोगत असल्याची बाब या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आणली आहे.

संबंधित बातम्या 

अकोल्यात जात पंचायतीकडून महिलेला थुंकी चाटण्याची शिक्षा; नीलम गोऱ्हेंची गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

पैसे नसतील तर बायको उपभोगायला द्या, जात पंचायतीचं संतापजनक फर्मान

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI