नांदेडच्या किनवटमध्ये वीज पडून शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटना वाढल्या, तहसील प्रशासनाचं महत्त्वाचं पाऊल

नांदेडच्या किनवटमध्ये वीज पडून शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटना वाढल्या, तहसील प्रशासनाचं महत्त्वाचं पाऊल
किनवट तहसील प्रशासनाने आदिवासी पाड्यावर जाऊन वीजांपासून बचाव करण्यासाठी जनजागृती केलीय.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे किनवट तहसील प्रशासनाने आदिवासी पाड्यावर जाऊन वीजांपासून बचाव करण्यासाठी जनजागृती केलीय. | Nanded kingaon lightning

राजीव गिरी

| Edited By: Akshay Adhav

Jul 09, 2021 | 10:32 AM

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे किनवट तहसील प्रशासनाने आदिवासी पाड्यावर जाऊन वीजांपासून बचाव करण्यासाठी जनजागृती केलीय. (death farmers has risen due to lightning in Kingaon Nanded, raising awareness from the administration)

नांदेडमध्ये मान्सूनने कमबॅक केल्यापासून विजांच्या कडकडाटासह चांगला पाऊस पडतोय. याचदरम्यान किनवटमध्ये जवळपास तीन शेतकऱ्यांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. त्यामुळे किनवट तहसील प्रशासनाने आदिवासी पाड्यावर जाऊन वीजांपासून बचाव कसा कारावा, यासाठी जनजागृती केली आहे.

शिवणी आणि दयाळ धानोरा या वनक्षेत्र बहुल गावात वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबाचे सांत्वन तहसीलदारांनी केलं आहे. पीडित कुटुंबाची माहिती घेऊन त्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात येईल, असेही तहसीलदारांनी ग्रामस्थांना आश्वासन दिलय. दरम्यान किनवट तालुक्यात गत दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह चांगला पाऊस पडतोय. या दरम्यान शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केलंय.

नांदेडच्या मुदखेडमध्ये वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू

मुदखेड तालुक्यातील मुगट इथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. 55 वर्षीय दत्ता ढेपाळे हे शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. या दुर्दैवी घटनेत ढेपाळे यांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे मुगट गावावर शोककळा पसरलीय.

दुपारच्या सुमारास मुगट गावात अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबरच विजांचा कडकडाट देखील सुरु होता. शेतामध्ये दत्ता ढेपाळे आणि त्यांचा मुलगा होता. पाऊस आल्याने ते बैलाला घेऊन झोपडीकडे येत असताना दत्ता ढेपाळे यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुदखेड येथील शासकीय दवाखान्यात सायंकाळी 5 च्या सुमारास शवविच्छेदनासाठी त्यांची बॉडी नेण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे.

नागपूरमध्येही वीज अंगावर पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात वीज अंगावर पडून एकाच वेळी तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. रामटेक तालुक्यातल्या चोरखुमारी शिवारातली ही घटना आहे. दुपारी तीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर शेतातील झोपडीत आश्रयाला थांबलेल्या पाच शेतकरी मजूरांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. (3 Farmer Death lighting Strike In nagpur Ramtek)

दिलीप मंगल लांजेवार, मधुकर पंधराम आणि योगेश कोकण अशी तिन्ही मृतांची नावं आहेत. वीज अंगावर पडून एकाचवेळी या तिघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर या घटनेत दोन शेतकरी मजूर जखमी झालेत जखमींमध्ये बारा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(death farmers has risen due to lightning in Kingaon Nanded, raising awareness from the administration)

हे ही वाचा :

वीज ‘काळ’ बनून आली, नागपुरात तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, दोघे सुदैवाने बचावले 

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें