दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुवर्तन सोहळा, बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती अनुयायांना धम्माची दीक्षा

यंदाच्या सोहळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाची यात्रा, 16 ऑक्टोबर रोजीचा मुख्य कार्यक्रम तर बुद्ध धम्म गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम ही आकर्षणे असणार आहेत.

दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुवर्तन सोहळा, बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती अनुयायांना धम्माची दीक्षा
प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी काय?Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 6:19 PM

नीलेश डाहाट, Tv9 मराठी, प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूरच्या दीक्षाभुमी येथे धम्मचक्र अनुवर्तनदिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येतो. यावर्षीसुध्दा 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या नियोजनाबाबत प्रशासन प्रमुखांनी प्रत्यक्ष दीक्षाभुमीस्थळी आढावा घेतला. कोरोनाच्या निर्बंधामुळे गत दोन वर्षात धम्मचक्र अनुप्रवर्तनाचा कार्यक्रम साजरा करता आला नाही.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी चंद्रपूर महापालिकेने परिसराची स्वच्छता, विद्युत व्यवस्था, पथदिवे, मोबाईल टॉयलेटची उपलब्धता करून दिली. महत्वाच्या पुतळ्यांची साफसफाई, परिसरात अग्निशमन दल, वैद्यकीय पथक तैनात ठेवणे, तसेच तात्पुरत्या स्वरुपात असलेले रस्त्यावरील अतिक्रमण काढणे आदीबाबत जय्यत तयारी केली आहे.

पार्किंगसाठी नेहमीच्या जागांव्यतिरिक्त पर्यायी जागांचा शोध, शहरात प्रवेश करणा-या रस्त्यांवर पार्किंग दिशादर्शक फलक लावणे, वाहतूक व्यवस्था व रॅलीच्या मार्गाबाबत जनजागृती करण्यासाठी सूचना देण्यात आल्यात.

महावितरण कंपनीने या दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही, याची काळजी घेणे तसेच संबंधित विभागांनी आपापल्या जबाबदा-या व्यवस्थितपणे सांभाळणे, अशा सूचना याप्रसंगी देण्यात आल्या.

यावेळी आयोजन समितीच्या वतीने जनरेटरची व्यवस्था, दीक्षाभुमी येथे कायमस्वरूपी हायमास्ट, मान्यवरांसाठी विश्रामगृहाची उपलब्धता, स्टॉलकरिता पुरेशी जागा, एसटी बसची उपलब्धता आदी मागण्या करण्यात आल्या.

यंदाच्या सोहळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाची यात्रा, 16 ऑक्टोबर रोजीचा मुख्य कार्यक्रम तर बुद्ध धम्म गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम ही आकर्षणे असणार आहेत. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अशोक घोटेकर यांनी दिली.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.