AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, धनजंय मुंडेंकडून शेतकऱ्यांना धीर 

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे धनंजय मुंडे बीड जिल्ह्याच्या टोकाच्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधांवर दाखल झाले. मुंडे यांनी आष्टी तालुक्यातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीस प्रारंभ केला.

नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, धनजंय मुंडेंकडून शेतकऱ्यांना धीर 
धनंजय मुंडे
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 4:32 PM
Share

बीड : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे धनंजय मुंडे बीड जिल्ह्याच्या टोकाच्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधांवर दाखल झाले. मुंडे यांनी आष्टी तालुक्यातून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीस प्रारंभ केला. पालकमंत्र्यांनी पीकविमा कंपनी सह संयुक्त पंचनाम्यांचे निर्देश दिले आहेत. तर, नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन देखील धनजंय मुंडे यांनी दिलं आहे.

मराठवाडी गावापासून पाहणीला सुरुवात

बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असून आष्टी तालुक्यातील काही महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे आज सकाळपासून बीड जिल्ह्यात पाहणी दौरा करत आहेत. आष्टी तालुक्यातील मराठवाडी या जिल्ह्याच्या टोकाच्या गावापासून दौऱ्याला सुरुवात झाली असून, नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी मराठवाडी गावकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.

आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या मराठवाडी, शेडाळा, देऊळगावघाट, सावरगांव, गंगादेवी या गावांची पाहणी करताना शेतातून पिके वाहुन गेलेल्या बाजरी, सोयाबीन आदी पिकांची शेतांवर जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी रमेश मुडलोड, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी जेजुरकर, माजी आमदार साहेबराव दरेकर,तहसीलदार राजाभाऊ कदम, डॉ. शिवाजी राऊत, सतिश शिंदे, अण्णासाहेब चौधरी, शिवाजी डोके, महादेव डोके, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

एकत्रित पंचनामे करण्याचे आदेश

आता नुकसानीचे पुर्वीप्रमाणे पंचनामे न करता महसुल, कृषी व विमा कंपनीचे असे तीनही अधिकारी यांनी संयुक्तपणे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करतील. त्यानुसार जास्तीत जास्त भरपाई महाविकास आघाडी सरकारकडून मिळवुन देण्यासाठी मी व माझे सहकारी प्रयत्नशील असल्याचे धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी गंगादेवी येथील तुटलेला रस्ता,सावरगाव येथील छोट्या नदीच्या पुरामुळे झालेले नुकसान याचीदेखील पाहणी करून धनंजय मुंडे यांनी गंगादेवी येथील गावकऱ्यांच्या मागणीनुसार रस्त्याच्या पुनर्बांधणी कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

शेतकऱ्यांनी व्यथा धनंजय मुंडेंसमोर मांडल्या

आष्टी तालुक्यातील मराठवाडी येथून धनजंय मुंडे यांच्या दौऱ्यास सुरुवात झाली असून शेडळा, सावरगाव याठिकाणच्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पालकमंत्री मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. यानंतर गेवराई तालुक्यातील गंगावाडी, तलवाडा, रामनगर, राजरी मळा, या ठिकाणी पाहणी करणार आहेत. शेतीतील खरीप पिकांचे आणि फळ बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. असं आश्वासन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे. या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पालकमंत्र्यांसमोर मांडल्या असून पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

इतर बातम्या:

‘महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेले लोक काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का?’

‘गुडमॉर्निंग अण्णा, आमच्यासाठी आंदोलन कधी?’, व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा अण्णा हजारेंना चिमटा

Dhananjay Munde visit heavy rainfall affected areas of Beed district assures farmers compensation will given to farmers

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...