चंद्रपूरच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात वाद, प्राध्यापक-व्यवस्थापन आमनेसामने, काय आहे प्रकरण?

चंद्रपूरच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात वाद, प्राध्यापक-व्यवस्थापन आमनेसामने, काय आहे प्रकरण?
चंद्रपूरच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात वाद निर्माण झालाय.
Image Credit source: tv 9

चंद्रपूरच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक-व्यवस्थापन पुन्हा एकदा समोरासमोर आले. गेली चार वर्षे रखडलेल्या वेतन मुद्द्यावरून प्राध्यापकांचा व्यवस्थापना विरोधात असंतोष व्यक्त केलाय. बैठकीच्या निमित्ताने प्राचार्य केबीनमध्ये पोचलेल्या प्राध्यापकांनी धमकी दिल्याचा प्राचार्यांचा आरोप आहे, तर चार-चार वर्षे विनावेतन काम करणाऱ्या प्राध्यापकांनी काय गुन्हा केला असा आंदोलक प्राध्यापकांचा सवाल आहे.

निलेश डाहाट

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 15, 2022 | 4:59 PM

चंद्रपूर : चंद्रपूरच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात (Rajiv Gandhi College of Engineering) प्राध्यापक-व्यवस्थापन पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. गेली चार वर्षे रखडलेल्या वेतन मुद्द्यावरून प्राध्यापकांचा व्यवस्थापनाविरोधात (Professor-Management) संघर्ष सुरू आहे. याआधीही मागील वर्षी दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनाने शैक्षणिक सत्रावर विपरीत परिणाम (Adverse Effects on Academic Session) झाला होता. आज पुन्हा वेतन मुद्यावर बैठकीच्या निमित्ताने प्राचार्य केबीनमध्ये पोचलेल्या प्राध्यापकांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप प्राचार्यांनी करत थेट पोलिसांना पाचारण केले. दुसरीकडे चार-चार वर्षे विनावेतन काम करणाऱ्या प्राध्यापकांनी जाब विचारला तर काय गुन्हा केला असा सवाल आंदोलक प्राध्यापकांनी विचारला आहे.

शैक्षणिक वातावरण झाले गढूळ

महाविद्यालयातील तणाव निवळण्यासाठी पोलिसांना पाचारण केल्यानंतर प्राध्यापकवर्गाच्या नाराजीत आणखी भर पडली. महाविद्यालयात अभूतपूर्व गोंधळ सुरू असताना दुसरीकडे व्यवस्थापनाने मात्र सर्व जबाबदारी प्राचार्यांवर ढकलल्याचे चित्र दिसून आले. विदर्भातील नामांकित महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण मात्र या कलहाने गढूळ झाले आहे. प्राध्यापकांच्या मागण्या रास्त असल्याचं आंदोलक प्रा. धनंजय मेश्राम यांचं म्हणण आहे. तर राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जफर खान व्यवस्थापनाची बाजू मांडत आहेत. या सर्व प्रकरणात विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळं व्यवस्थापनानं पुढाकार घेऊन मध्यम मार्ग काढावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. चंद्रपूरच्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक-व्यवस्थापन पुन्हा एकदा समोरासमोर आले. गेली चार वर्षे रखडलेल्या वेतन मुद्द्यावरून प्राध्यापकांचा व्यवस्थापना विरोधात असंतोष व्यक्त केलाय.

नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ, लवकरच येणार उष्णतेची लाट?

चंद्रपुरात रोजगारासाठी उपोषण, 9 दिवसांपासून आंदोलन, आंदोलकाची प्रकृती चिंताजनक

गडचिरोलीत अवैध खंडणी वसुली, बोगस बंदुकधारी नक्षलवादी जेरबंद, काय आहे प्रकरण?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें