नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ, लवकरच येणार उष्णतेची लाट?

पश्चिम विदर्भात तापमान जास्त राहणार आहे. वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट जास्त राहणार आहे. आकाश कोरडे राहणार आहे. राजस्थानकडून गरम हवा वाहत आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. असा अंदाज नागपूर हवामान विभागानं वर्तवला आहे.

नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ, लवकरच येणार उष्णतेची लाट?
विदर्भात उष्माघाताची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 4:19 PM

नागपूर : नागपूरसह विदर्भात तापमानात वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसांत विदर्भात उष्णतेची लाट (Heat wave in Vidarbha) येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पश्चिम विदर्भात तापमान जास्त राहणार आहे. वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट जास्त राहणार आहे. आकाश कोरडे राहणार आहे. राजस्थानकडून (Rajasthan ) गरम हवा वाहत आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. असा अंदाज नागपूर हवामान विभागानं (Nagpur Meteorological Department) वर्तवला आहे. येत्या दोन दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात पारा 16 मार्चपासून चाळीशी पार करणार आहे. बुधवारपासून नागपुरात 40 ते 41 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा जाणार आहे. त्यामुळं दुपारी घराबाहेर पडणाऱ्यांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दुपारी घराबाहेर पडणे कठीण होणार आहे.

तापमान 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार

15 मार्च रोजी चंद्रपुरात 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारपासून ही 41 अंश सेल्सिअस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अकोला जिल्ह्यात आज 40 डिग्री सेल्सिअस तापमाना उद्या तो येत्या आठवड्यात 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अमरावती जिल्ह्यातही तापमान उद्यापासून 41 डिग्री अंस सेल्सिअसपेक्षा जास्त राहणार आहे. अशीच काहीसी परिस्थिती विदर्भातील इतर जिल्ह्यात राहणार आहे. हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केला आहे.

अशी घ्या काळजी

येत्या एक-दोन दिवसांत उष्णतेची लाट येणार असल्यानं दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे. थोड्या-थोड्या वेळाने पाणी पित राहावे. हलके तसेच पातळ पदार्थांचे सेवन करावे. तसेच सुती कपडे वापरावे. घराबाहेर पडताना सनग्लास, छत्री, स्कार्प, टोपी यांचा वापर करावा, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी, अमरावतीच्या शेतकऱ्याची लेक विदर्भात प्रथम

युवक काँग्रेस निवडणूक, तौसिफ खान नागपूरचे शहराध्यक्ष, निवडणुकीत गैरप्रकार झालाय?

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! जामीन अर्ज कोर्टाने नाकारला, अडचणी आणखी वाढणार?

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.