AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळूमामांच्या नावाचा वापर करून भक्तांच्या आर्थिक लुटीचा गंभीर आरोप, कोल्हापूर-सोलापूरमध्ये वारसावरुन मोठा वाद

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर ग्रामपंचायतीने सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील मनोहर मामा यांच्याबद्दल एक पत्र काढल्यानंतर बाळूमामा यांच्या वारसावरून वाद निर्माण झाला आहे.

बाळूमामांच्या नावाचा वापर करून भक्तांच्या आर्थिक लुटीचा गंभीर आरोप, कोल्हापूर-सोलापूरमध्ये वारसावरुन मोठा वाद
| Edited By: | Updated on: Aug 28, 2021 | 8:21 AM
Share

सोलापूर : ‌कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर ग्रामपंचायतीने सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील मनोहर मामा यांच्याबद्दल एक पत्र काढल्यानंतर बाळूमामा यांच्या वारसावरून वाद निर्माण झाला आहे. आपण बाळूमामाचे भक्त आहोत. बाळूमामाची उपासना करतो, पण आजपर्यंत कधीही बाळूमामांचे वंशज अथवा त्यांचा अवतार आहे असं वक्तव्य कुठेही केलेले नाही. तसेच श्रीक्षेत्र उंदरगाव येथील मठातून भक्तांची कुठलीही आर्थिक लूट केली जात नाही, असे स्पष्टीकरण मनोहर मामा यांनी दिलेलं आहे.

ग्रामपंचायतीकडून ठराव करत भक्तांच्या आर्थिक लुटीचा आरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर हे संत बाळूमामांचे मूळ स्थान आहे. येथील ग्रामपंचायतीने करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील बाळुमामाचे भक्त मनोहर मामा हे संत बाळूमामा यांच्या नावाचा वापर करून भक्तांकडून आर्थिक देणगी घेत असल्याचा आरोप आदमापूर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय गुरव यांनी केलाय. यावर ग्रामपंचायतीने तसा ठराव देखील केला आहे.

आदमापूरचे बाळूमामांचे भक्त आणि करमाळ्यातील मनोहर मामा यांच्यात वाद

ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर आदमापूर येथील बाळूमामाचे भक्त आणि करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. त्यावर उंदरगाव येथील बाळुमामाचे भक्त मनोहर मामा यांनी आपण बाळूमामाचा वारसदार किंवा शिष्य नसून केवळ भक्त म्हणून सेवा करत आहे. उंदरगाव येथे माझ्या स्वतःच्या शेतात बाळूमामाचे मंदिर उभे केले आहे. येथे दर्शनासाठी राज्यभरातून अनेक भाविक येतात केवळ मंदिर आहे म्हणून माझा आणि आदमापूर येथील बाळूमामा संस्थांचा किंवा मंदिराशी कोणताही संबंध नसल्याचेही मनोहर मामा यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा :

शिर्डीत हजारो भाविकांची मांदियाळी; कळस दर्शनासाठी मोठी गर्दी

Lord Shree Krishna | जेव्हा एका भक्तासाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण साक्ष द्यायला आले! जाणून घ्या ही पौराणिक कथा…

वेड्या भक्ताची अनोखी कहाणी, जगन्नाथ मंदिरात अज्ञाताकडून तब्बल ‘इतक्या’ रुपयांचे सोने-चांदी दान

व्हिडीओ पाहा :

Dispute in Devotee of Balu Mama over donation claim in Kolhapur Solapur

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.