उस्मानाबादेत 2 दिवसात 278 कोटींचं नुकसान, हिरवीगार शेती उद्धवस्त; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, मदतीकडे नजरा

उस्मानाबाद जिल्ह्यात 27 आणि 28 सप्टेंबर या 2 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे 278 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल विभागाने तयार करुन सरकारकडे पाठविला आहे.

उस्मानाबादेत 2 दिवसात 278 कोटींचं नुकसान, हिरवीगार शेती उद्धवस्त; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, मदतीकडे नजरा
उस्मानाबादेत जोरदार पावसाने मोठं नुकसान
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 7:47 AM

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात 27 आणि 28 सप्टेंबर या 2 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे 278 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल विभागाने तयार करुन सरकारकडे पाठविला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह नागरिकांच्या मदतीकडे मोठ्या आशेने नजरा लागल्या आहेत. हा प्राथमिक अंदाज असून यापेक्षा अधिक प्रमाणात नुकसान झाले असुन पंचनामे व पाहणी सुरू आहे.

हिरवीगार शेती उद्धवस्त, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, मदतीकडे नजरा

शेती, रस्ते, जनावरे, घरांची पडझड झाली असून पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जात असले तरी मदत लवकर मिळाली तरच खऱ्या अर्थाने त्यांना दिलासा मिळणार आहे. केंद्र व राज्य सरकारने एकमेकांकडे बोट न दाखविता आणि राजकारण, आरोप प्रत्यारोपात वेळ वाया न घालता भरीव मदत करणे गरजेचे आहे.

उस्मानाबादला सावरण्यासाठी मोठ्या निधीची गरज, अनेकांच्या मदतीकडे नजरा

उस्मानाबाद जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असुन अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्यात खरडून गेली आहे. या अतिवृष्टीचा फटका 2 लाख 88 हजार 137 शेतकऱ्यांना बसला असून 2 लाख 66 इतक्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 146 कोटी 35 लाख 46 हजार 200 रुपये इतका निधी अपेक्षित आहे. पुरामुळे अनेक गावातील रस्ते महामार्ग खराब झाले असून 134 किलोमीटर मार्गाचे नुकसान झाले असून त्याच्या दुरुस्तीसाठी 51 कोटी 71 लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 82.10 किमी रस्त्यासाठी 22 कोटी 49 लाख तर जिल्हा परिषदेच्या 51.80 किमी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 29 कोटी 22 लाख रुपये लागणार आहेत. पुराने इतके रौद्ररूप धारण केले होते की त्यात 109 पुलांचे मोठे नुकसान झाले त्यातील अनेक पूल खचले तट काही पुल वाहून गेले त्यांच्या दुरुस्तीसाठी 38 कोटी 76 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे 44 पुलांचे 29 कोटी 61 लाख तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे 65 पुलांचे 9 कोटी 15 लाख नुकसान झाले आहे.

तलाव फुटले, शेती वाहून गेली

उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे 5 तलाव फुटण्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शेती वाहून गेल्याने झाले आहे. या तलावाच्या दुरुस्तीसाठी 80 लाख लागणार आहेत. पुरात महावितरणच्या पोल, डीपी व इतर पायाभूत सुविधांचे 1 कोटी 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

2 दिवसांत 278 कोटींचं नुकसान

पुरात वाहून गेल्याने 2 व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यांना 8 लाख मदत देणे अपेक्षित आहे लहान मोठी अशी 110 जनावरे मयत झाली असून त्याची भरपाई म्हणून 33 लाख निधींची गरज आहे. पावसाने व पुराने नदी काठच्या घरासह इतर घराची मोठी पडझड झाली, 1 हजार 87 घरांची पडझड झाली असून त्यांना 65 लाख 22 हजार मदत करने गरजेचे आहे. अतिवृष्टीच्या काळात जवळपास 500 च्या वर लोकांना पुरातून वाचविण्यात आले. अश्या प्रकारे 278 कोटी 96 लाख 2 दिवसात नुकसान झालं आहे.

(Due to Heavy rains have caused severe damage in Maharashtra Osmanabad district)

हे ही वाचा :

नवरात्रीला तुळजापूरला जाताय?, पहिल्यांदा नियम वाचा, 15 हजार भाविकांनाच दर्शन, कोजागिरी पौर्णिमा यात्रा रद्द!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.