AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनचा फटका, नवी मुंबई मार्केटमध्ये भाजीपाला पडून, भाजीपाल्याच्या दरात 50 टक्क्यांनी घसरण

राज्य सरकारने लॉकडाउन शिथिल केल्यांनतर मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मालाला चांगला उठाव मिळाला होता. पण पुन्हा निर्बंध लादल्याने भाज्यांच्या दरात घसरण पाहायला मिळतीय. (Falling prices Vegetables in navi mumbai APMC)

लॉकडाऊनचा फटका, नवी मुंबई मार्केटमध्ये भाजीपाला पडून, भाजीपाल्याच्या दरात 50 टक्क्यांनी घसरण
भाज्यांच्या दरात घसरण...
| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 1:57 PM
Share

नवी मुंबई : राज्यात सरकारने पुन्हा टाळेबंदी नियमावली बदलल्याचा परिणाम मुंबई एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये पाहायला मिळाला. काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र तिसऱ्या स्तराचे नियम लागू करण्यात आले असून फेरीवाले तसेच किरकोळ भाजीपाला विक्रीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच मुभा देण्यात आली आहे. किरकोळ विक्रेते भाजीपाला घेऊन आपल्या जागेवर जाईपर्यंत विक्रीची वेळ निघून जात असल्याने त्यांचा माल शिल्लक राहतो. त्यामुळे तो दुसऱ्या दिवशी मार्केटला फिरकत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. ग्राहक नसल्याचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय शनिवार, रविवार दोन दिवस कडक टाळेबंदी असल्याने आज भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात माल पडून असल्याचे पाहायला मिळाले. शिवाय काही भाज्यांच्या दरात थेट 50 टक्के घसरण झाली. (Falling prices Vegetables in navi mumbai APMC )

भाजीपाल्याच्या दरात घसरण

राज्य सरकारने लॉकडाउन शिथिल केल्यांनतर मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मालाला चांगला उठाव मिळाला होता. तर काही भाज्या प्रतिकिलो 50 रुपयांहून अधिक विकल्या जात होत्या. मात्र, नवीन नियमावलीचा फटका भाजीपाला व्यापाराला बसला आहे. तर भाजीपाल्याचा दरात घसरण झाली असून 30 टक्के माल विक्रिविना शिल्लक असल्याचे सांगण्यात येत आहे.

एपीएमसी मार्केटमधील व्यापार पूर्णतः थंडावला

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज 530 गाड्या आवक झाली आहे. परंतु भाज्यांना उठाव नसल्याने व्यापारी हैराण झाले आहेत. तर अचानक उतरलेले भाजारभावाने शेतकऱ्यांसह व्यापारी हवालदिल झाले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून मुंबई एपीएमसी मार्केटमधील व्यापार पूर्णतः थंडावल्याचे भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच किरकोळवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने मुंबई आणि उपनगरात ह्याच भाजीपाला किरकोळ मध्ये 50 ते 100 रुपये किलोने विक्री केला जात आहे.

भाजीपाल्याचा दर किती?

सद्यस्थितीत मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भेंडी 10 रुपये, वांगी 12 रुपये, काकडी 10 रुपये, मिरची 24 रुपये, शिमला मिरची 16 रुपये, दुधी 20 रुपये, कारली 36, पडवळ 18 रुपये, फ्लावर 14, मेथी जुडी 10 ते 12 रुपये, पालक जुडी 5 ते 7 रुपये तर कोथिंबीर जुडी 10 रुपये विकली जात आहे.

(Falling prices Vegetables in navi mumbai APMC)

हे ही वाचा :

PM Kisan : पीएम किसान योजनेच्या लाखो शेतकऱ्यांचे पैसे अडकले, तुमच्या खात्यात 2 हजार पोहोचले का?

Maharashtra Krishi Diwas 2021: काँग्रेसचे असे मुख्यमंत्री, ज्यांनी शिवसेनेच्या वाघाला बळ दिलं, जे ‘स्वावलंबनासाठी’ फाशी जाईन म्हणाले!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.