गडनदी धरण तुडुंब भरले, नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
धरणातील सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये कुतुहालाचा विषय बनला आहे. (Gadanadi dam at Sangameshwar filled to full capacity)

गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या काही दिवसांपासून गडनदी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे गडनदी धरणातून सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नदी किनारी गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Gadanadi dam at Sangameshwar filled to full capacity riverside villages warned of danger)
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत. या धरणात क्षमता पूर्ण पाणीसाठा झाला आहे. या धरणातील सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये कुतुहालाचा विषय बनला आहे. तर प्रकल्प सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
नागरिकांनी खबरदारी घेण्याची सूचना
सध्या गडनदी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 11 जूनला सकाळी 11 पर्यंत या ठिकाणी एकूण 50 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली. तर आतापर्यंत या भागात 575 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गडनदी धरण पाहायला जाणाऱ्यांनी धरणात उतरु नये. तसेच सांडव्याच्या पाणी प्रवाहात शिरण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याशिवाय नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही उपविभागीय अभियंता संजय सोनावणे यांनी केल्या आहेत.
तसेच शेतकऱ्यांनी नदीपात्रात उतरु नये. स्वत: सह जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहनही राजिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष येडगे यांनी केले आहे.
गडनदी धरणाची थोडक्यात माहिती
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ही 126.15 मीटर इतकी आहे. सध्या त्याची पाणी पातळी ही 121.20 एवढी आहे. त्याशिवाय आता त्यातून 41.092 घ.मी./ सेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या धरणात एकूण 64.88 दल.घ.मी पाणीसाठा आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा 64.56 दलघमी एवढा आहे. (Gadanadi dam at Sangameshwar filled to full capacity riverside villages warned of danger)
शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीपासून शिवसेना अलिप्त का?; संजय राऊतांनी सांगितलं कारणhttps://t.co/NBSB4dsCeT#shivsena | #sanjayraut | #sharadpawar | #thirdfront | #NCP
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2021
संबंधित बातम्या :
माथेरानमधील 10 फुटीर नगरसेवकांचा राजकीय एन्काऊंटर, शिवसेनेचा भाजपला धक्का
कोरोनामुळे घर खरेदीचा पॅटर्न बदलला, शहराबाहेर घर खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती
पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याला शिवीगाळ करुन मारहाण, अहमदनगरमध्ये गुन्हा
