AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadchiroli Rain | गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस, मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 24 दरवाजे उघडले

जिल्ह्यातील मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या 24 दरवाजातून 43680 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे.

Gadchiroli Rain | गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस, मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 24 दरवाजे उघडले
GADCHIROLI DAM
| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 12:09 AM
Share

गडचिरोली : जिल्ह्यातील मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 24 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या 24 दरवाजातून 43680 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणात एकूण 83 गेट असून त्यातून फक्त 24 गेट सध्या उघडण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने जोर धरला आहे. गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतो आहे. याच पावसामुळे मेडीगट्टा लक्ष्मी धरणातील पाणीसाठा वाढला. परिणामी या धरणाचे 24 दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. (Gadchiroli 24 hours of Medigadda Lakshmi Dam has been open due to rain)

नद्यांमधील पाणी धोक्याच्या इशारा पातळीच्या खाळी

मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पाऊस वाढल्यामुळे गडचिरोलीतील मेडीगट्टा लक्ष्मी धरणाची पाणीपातळी वाढली आहे. याच कारणामुळे या धरणाचे सध्या 24 दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या धरणाला एकूण 83 गेट आहेत. यातील 24 गेट हे उघडण्यात आले आहेत. वैनगंगा नदी, वर्धा नदी, प्रणहिता नदी, इंद्रावती नदी, तसेच पारलाकोटा या नद्या गडचिरोली जिल्ह्याला लागून आहेत. गडचिरोली तसेच इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे या नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. मात्र या सर्व नद्यांची पाणीपातळी केंद्रातील नोंदीनुसार धोक्याच्या इशारा पातळीच्या खाली आहे.

14 जुलै रोजी राज्यात पावसाची काय स्थिती

दरम्यान, राज्यात हवामान विभागाने ठिकठिकाणी पावसाचा अंदाज सांगितला आहे. हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर, पुणे जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर सिंधुदुर्ग ठाणे, पालघर, मुंबई आणि धुळेला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर जालना, औरंगाबाद लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली, यवतमाळ, अकोला, वाशिम अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरला येलो अ‌ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली लातूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हलका पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

15 जुलै रोजी राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई आणि पालघरला येलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

16 जुलैला पावसाचा काय अंदाज

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा,पुणे, ठाणे, पालघर, मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, चंद्रपूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार वगळता इतर सर्व जिल्ह्यात पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

17 जुलै रोजी पावसाची काय स्थिती?

हवामान विभागानं 17 जुलै रोजी राज्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे तर सातारा, कोल्हापूर आणि रायगडला येलो अ‌ॅलर्ट दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इतर बातम्या :

Monsoon Update :चार दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD चा नेमका अंदाज काय?

राज्यात खरिपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण, दमदार मान्सूनची प्रतीक्षा, दादाजी भुसे यांची माहिती

वाशिमच्या शेतकऱ्यांनी दाखवलं एकीचं बळ, पुण्यात प्रशिक्षण घेत बांधावर प्रयोगशाळा, जैविक रसायनांची शिवारात निर्मिती

(Gadchiroli 24 hours of Medigadda Lakshmi Dam has been open due to rain)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.