पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या तरुणाच्या छातीवर शरद पवारांचा टॅटू

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक करण्यात आली होती. गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी अमित सुरवसे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या तरुणाच्या छातीवर शरद पवारांचा टॅटू
गोपीचंद पडळकर, आरोपी अमित सुरवसे, शरद पवार
रोहित पाटील

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 15, 2021 | 11:30 AM

सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर दगड मारणारा आरोपी अमित सुरवसे याच्या छातीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे गोंदण असल्याचं समोर आलं आहे. पवारांवरील टीकेनंतर पडळकरांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. हा हल्ला केल्याप्रकरणी अमित सुरवसे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

सोलापुरातील घोंगडी बैठकीसाठी आलेले भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी अमित सुरवसे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

कोण आहे अमित सुरवसे?

पोलिस तपासात अमित सुरवसेच्या छातीवर शरद पवार यांचा फोटो गोंदलेला असल्याचे आढळले आहे. त्याखाली “द वॉरिअर’ असे लिहिले आहे. हा फोटो हल्ल्याच्या आधीपासून गोंदवलेला असल्याचं समोर आलं आहे. अमित सुरवसे हा धनगर समाजातील युवक असून नातेवाईकांच्या शैक्षणिक संस्थेत असिस्टंट म्हणून काम पाहतो. त्याने यापूर्वी दोन वेळा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही दिल्या आहेत.

दगडफेक केल्याची कबुली

शरद पवार यांचे राज्यासोबतच देशाच्या विकासातही मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे अनेक गोरगरिब कुटुंबातील मुलींना नोकरी मिळाल्या. शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप काही केले आहे. समाजकारण करताना त्यांनी स्वत:च्या कुटुंबाकडेही पुरेसा वेळ दिला नाही, त्यामुळे असे कृत्य केल्याची कबुली अमितने पोलिसांकडे दिली आहे.

नेमकं काय घडलं?

भाजप आमदार गोपीचंद पडळकर 1 जुलै रोजी घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात आले होते. श्रीशैल नगर येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवस दगडफेक करणारा तरुण अमित सुरवसे आणि त्याचा साथीदार निलेश क्षीरसागर हे फरार होते. अखेर तीन जुलैला त्यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिपरगा येथून ताब्यात घेण्यात आले

संबंधित बातम्या :

आधी गाडीवर हल्ला, आता गोपीचंद पडळकरांवर गुन्हा, पडळकर म्हणतात, अजित पवारांना का सोडलं?

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

(Gopichand Padalkar Car Stone Pelting Accuse Amit Suravase has Tattoo of Sharad Pawar on chest)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें