शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये धान, विद्यार्थ्यांना कुठे बसवून धडे द्यायचे? शिक्षकांसमोर प्रश्न, पालकांना चिंता

जिल्ह्यात रब्बीतील धान खरेदीसाठी यंदा गोदाम उपलब्ध न झाल्याने आश्रमशाळा आणि जिल्हा परीषदेच्या काही शाळांचा गोदाम म्हणून वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये धान, विद्यार्थ्यांना कुठे बसवून धडे द्यायचे? शिक्षकांसमोर प्रश्न, पालकांना चिंता
जिल्ह्यात रब्बीतील धान खरेदीसाठी यंदा गोदाम उपलब्ध न झाल्याने आश्रमशाळा आणि जिल्हा परीषदेच्या काही शाळांचा गोदाम म्हणून वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 1:58 PM

गोंदिया : जिल्ह्यात रब्बीतील धान खरेदीसाठी यंदा गोदाम उपलब्ध न झाल्याने आश्रमशाळा आणि जिल्हा परीषदेच्या काही शाळांचा गोदाम म्हणून वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पण अद्यापही या धानाची उचल करण्यात आली नसल्याने आता विद्यार्थ्यांना कुठे बसवून धडे द्यायचे?, असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.

रब्बीतील धान खरेदीवर गोदामांअभावी परिणाम होऊन त्याचा भुर्दंड शिक्षकांना बसू नये यासाठी गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी शाळा सुरु होईपर्यंत गोदाम म्हणून वर्गखोल्यांमध्ये धान ठेवण्यास करण्यास परवानगी दिली. त्यानुसार आश्रमशाळा व इतर ठिकाणी आदिवासी कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये धान साठवून ठेवण्यात आले.

विद्यार्थ्यांना कुठे बसवून धडे द्यायचे? शिक्षकांसमोर प्रश्न

दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने 5 जुलै रोजी शाळा सुरू करण्याचे पत्र काढले, तर आदिवासी विकास विभागाने 26 जुलैच्या परिपत्रकानुसार 2 ऑगस्टपासून आश्रमशाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आश्रमशाळा व्यवस्थापनाचे दीर्घ काळापासून बंद असलेली शाळा पूर्ववत सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत; परंतु शाळेच्या इमारतींमध्ये धान साठविले असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह निवासी शाळा कशी सुरू करावी?, असा प्रश्न आश्रमशाळा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकर धान उचलून शाळा सुरु करण्याची मागणी पालक करीत आहे.

पालकांकडून संताप, आंदोलनाचा इशारा

आता जिल्हा प्रशासनाविरोधात आदिवासी संघटनेकड़ून संताप व्यक्त केला जात असून गोंदिया जिल्हा प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन उभा करण्याचा इशारा आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदतर्फे देण्यात आला आहे.

आदिवासी विकास महामंडळ कुंभकर्णी झोपेत

आश्रमशाळांच्या इमारतीमध्ये खरेदी केलेले धान त्वरित खाली करण्याचे निर्देश आदिवासी विकास महामंडळाला दिले. मात्र, यानंतरही धानाची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसवायचे कुठं?, असा प्रश्न आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. एवढं सगळं होऊनही आदिवासी विकास महामंडळ कुंभकर्णी झोपेत आहे.

(Grain in school classrooms, where to sit and teach students? Questions in front of teachers in Gondia)

हे ही वाचा :

शेतीमधल्या नव्या वाटा, धानासाठी प्रसिद्ध गोंदियात फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, लाखोंची कमाई

पालकमंत्री एक बोलतात, आरोग्यमंत्री दुसरं आणि मुख्यमंत्री तिसरंच, पुण्याच्या निर्बंधांवरुन महापौरांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगली दौऱ्यात गोंधळ, भाजप कार्यकर्त्यांसह 20 जणांवर गुन्हा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.