राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढला; 45 रुग्णांची नोंद, सात जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट

Delta Variant | यामध्ये 27 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश असल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यातील रत्नागिरी, जळगाव, पुणे, ठाणे, मुंबई, बीड आणि औरंगाबादमध्येही डेल्टाचा व्हेरियंट आढळला आहे.

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढला; 45 रुग्णांची नोंद, सात जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट
डेल्टा प्लस व्हेरिएंट

जालना: राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची वाढ झाली असून ही संख्या आता राज्यात 21 वरून 45 वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये 27 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश असल्याचे टोपे यांनी सांगितले. राज्यातील रत्नागिरी, जळगाव, पुणे, ठाणे, मुंबई, बीड आणि औरंगाबादमध्येही डेल्टाचा व्हेरियंट आढळला आहे. मात्र, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून कडक निर्बंध

सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून पुढील आदेश येईपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, कसमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं हे नवे आदेश लागू केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये निर्बंध शिथील झाले आहेत. तर देशपातळीवरही कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने घटत आहे. शनिवारच्या आकडेवारीनुसार 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली. शनिवारी दिवसभरात 39 हजार 70 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 491 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

भारतात चिंतेचे कारण नाही!

सध्या ‘डेल्टा प्लस’मुळे भारतामध्ये चिंता करण्याचे कारण नाही. हे प्रकरण युरोपमध्ये मार्चच्या उत्तरार्धात समोर आले आहे, असे समजते. 17 जूनपर्यंत, जीआयएसएआयडी, ओपन सायन्स डेटाबेसच्या म्हणण्यानुसार, जगभरात या प्रकारांच्या 63 घटना घडल्या; त्यात सहा भारतीयांचा समावेश आहे. कोरोना टास्कफोर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. व्ही.के. पॉल म्हणतात, “आम्ही INSACOGच्या माध्यमातून त्याचे अस्तित्व आणि वाढीवर लक्ष ठेवत आहोत. अद्यापपर्यंत हे माहित नाही की, या विषाणूची वाढ झालेली की नाही. जोपर्यंत तसे दिसत नाही, तो पर्यंत काळजीचे काही कारण नाही.”

याचा अर्थ असा नाही की देशाने यावर लक्ष ठेवू नये. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथम नोंदवलेला डेल्टा प्रकार हा पूर्वीपेक्षा अपेक्षेपेक्षा अधिक वेगवान होता आणि एम्समध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, 2021मध्ये हाच व्हेरियंट देशातील दुसर्‍या लाटेचे कारण ठरला होते. सुरुवातीच्या काळात चीनमधून हा विषाणू भारतात आला आहे आणि सध्या देशभरात या विषाणूचा प्रादुर्भाव आहे.

संबंधित बातम्या:

कोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय? कशी घ्याल स्वतःची काळजी?

नवी मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण?

Published On - 7:45 am, Mon, 9 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI