नंदुरबारला यलो ॲलर्ट, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा; धुळ्यात रात्रभर मुसळधार, रेल्वे रुळ पाण्यात
नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तर, धुळे जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या पावसानं काही नागरिकांच्या घरात पाणी साचलं. तर, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावला पुराचा जोरदार तडाखा बसला आहे.

धुळे/नंदुरबार: जून महिन्यात मान्सूनचा पाऊस सुरु झाल्यापासून उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होतं. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यासमोर पीकं वाचवण्याचं आव्हान निर्माण झालं होतं. अखेर गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तर, धुळे जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या पावसानं काही नागरिकांच्या घरात पाणी साचलं. तर, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावला पुराचा जोरदार तडाखा बसला आहे. नंदुरबारला यलो अॅलर्ट असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मोठ्या खंडानंतर नंदुरबार जिल्ह्यात पावसाची हजेरी, दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या खंडानंतर मंगळवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पावसाची मोठी प्रतीक्षा लागून होती गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याचा ताण पडला होता. रात्री पासून सुरू झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने नदी नाले प्रवाहित झाल्यानंतर थोड्या फार प्रमाणात पाण्याची समस्या सुटणार आहे. तरीदेखील अजूनही जिल्ह्यात दमदार पाऊस नसल्याने सर्वांच्या नजरा दमदार पावसाकडे लागल्या आहेत.
धुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, घरात पाणी घुसलं
धुळ्यात मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील दूध डेअरी भागातील लक्ष्मी वाडी परिसरात कमरे पर्यंत पाणी साचले. पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसल्याने संसरोपयोगी साहित्या सह इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या 35 वर्षा पासून या भागात पावसा चे पाणी साचत असल्याने नागरिकांच्या घरात पाणी घुसून नुकसान होत आहे.
या बाबत स्थानिक नगरसेवक व प्रशासनाला वेळोवेळी पाठ पुरावा करून देखील प्रशासना कडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच स्थानिक नगरसेवकानी केलेले अवैध रस्त्याचे काम, उभारलेल्या इमारती, तसेच नाल्याची साफ सफाई होत नसल्यानेच पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांना फक्त निवडणुकीतच आम्ही दिसतो का? असा सवाल देखील नागरिकांनी लोक प्रतिनिधी ना केला आहे. झालेल्या नुकसाना चे पंच नामे करून भरपाई मिळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरासह जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली होती. सुमारे अडीच ते तास पाऊस झाल्याने शहरातील विविध भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून नागरिकांच्या घरात घुसले होते. पहाटे झालेल्या पावसामुळे नागरिक झोपेत असताना नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या पाण्यात घरगुती साहित्यासह मोटार सायकल, चारचाकी वाहने देखील पाण्यात असल्याचे दिसून आले.
या पावसा मुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे. तर काही भागात विजेच्या तारा तुटल्याने शहरातील बहुतांश भागात मध्य रात्री पासून बत्ती गूल झाली होती. तर, काही भागात वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. तसेच रेल्वेचे रुळ देखील या पावसाच्या पाण्या मुळे पाण्या खाली गेले होते.
इतर बातम्या:
राजू शेट्टी यांची पंचगंगा परिक्रमा सुरू, हजारो लोक एकवटले; 5 सप्टेंबरला जलसमाधी घेणार!
IMD issue yellow alert for Nandurbar heavy rainfall showered at Dhule
