जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडी खातं उघडणार? 3 उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी तीन गटात केवळ एक अर्ज आल्याने महाविकास आघाडी खातं उघडण्याची शक्यता निर्माण झालीय.

जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडी खातं उघडणार? 3 उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता
जळगाव जिल्हा बँक निवडणूक


जळगाव: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी तीन गटात केवळ एक अर्ज आल्याने महाविकास आघाडी खातं उघडण्याची शक्यता निर्माण झालीय. धरणगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सजय मुरलीधर पवार ,पारोळाचे आमदार चिमणराव पाटील,एरंडोल अमोल चिमणराव पाटील हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवड झाल्यात जमा आहेत.त्यामुळे माहविकास आघडी जळगाव जिल्हा बँकेत खातं उघडणार हे निश्चित झालंय.

सर्वपक्षीय पॅनेलची चर्चा फिस्कटली

जळगाव जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीत अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी जिल्हा बँकेत झाली होती. सर्व पक्षीय पॅनल फिस्कटल्या नंतर भाजपने स्वतंत्र लढण्यासाठी कंबर कसली त्यामुळे उमेदवारी दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाची धांदल उडाली.तीन वाजे पर्यंत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडी खातं उघडणार?

धरणगाव,एरंडोल आणि पारोळा विविध कार्यकारी सोसयटी गटातून एकच अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.धरणगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार,पारोळा गटातून शिवसेना आमदार चिमणराव पाटील व एरंडोल गटातून शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील यांचेच केवळ अर्ज दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे तिघे बिनविरोध निवड होत असल्याचे दिसत आहे. हे महविकास आघाडीचे यश मानले जात आहे.आज सायंकाळ सात वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत जाहीर होईल.त्या वेळी अधिक चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेच्या आमदार चिमणराव पाटील हे 9 वेळा संचालकपदी निवडून येत आहेत तर त्यांची बिनविरोधची ही तिसरी टर्म असेल. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार हे सुध्दा तिसऱ्यांदा बिनविरोध होत आहेत.तर शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील दुसऱ्यांदा बिनविरोध होत आहेत.

एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे असा सामना?

जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यात आले होते. मात्र काँग्रेस पक्षाने भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. काँग्रेसच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीनेदेखील भाजपसोबत पॅनल करण्यास नकार दिला आहे. तशी माहिती भाजप नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. या निर्णयामुळे आता राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे विरुद्ध भाजपच्या रक्षा खडसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तसेच दुसरीकडे काँग्रेसनेसुद्धा स्वबळाचा नारा दिल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

इतर बातम्या:

Jalgaon | जळगावात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे संघर्ष रंगणार

जळगावमध्ये एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे, ‘भाजपच्या एकला चलो’नंतर जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची होणार

Jalgaon District bank election MVA parties Shivsena two candidates and NCP one candidates will be elected as unopposed

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI