निवडणुकीत राष्ट्रवादी कार्यकर्ते कुठं कमी पडले? जयंत पाटलांकडून तुळजापूर-उमरगा मतदारसंघाचा आढावा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Updated on: Jun 24, 2021 | 4:37 PM

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील जोरदार कामाला लागल्याचं दिसत आहे.

निवडणुकीत राष्ट्रवादी कार्यकर्ते कुठं कमी पडले? जयंत पाटलांकडून तुळजापूर-उमरगा मतदारसंघाचा आढावा
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

उस्मानाबाद : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील जोरदार कामाला लागल्याचं दिसत आहे. आज (24 जून) ते उस्मानाबादमधील तुळजापूर-उमरगा मतदारसंघाच्या आढावा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मागील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोठे कमी पडले याचा आढावा घेताना आगामी निवडणुकांची रणनीती तयार करण्यासाठी बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा जनतेचा पक्ष आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडा, असं आवाहन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं (Jayant Patil started NCP organization strengthening tour from Osmanabad).

जयंत पाटील म्हणाले, “पक्षसंघटना बळकट हवी. बुथ कमिटी सक्षम केली तर येणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जाता येईल. शिवाय 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कुठे कमी पडले याची माहिती जाणून घेऊन आता येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीने कशी मात द्यायला हवी याचाही विचार करावा लागेल.”

आजपासून राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याला सुरुवात झालीय. जयंत पाटील पक्षाच्या बांधणीसाठी राज्यभरात राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याच्या माध्यमातून आढावा बैठका घेत आहेत. आज पहिल्या टप्प्यात तुळजापूर आणि उमरगा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांचे मुद्दे आणि अडचणी समजून घेत आहेत. तसेच अधिक प्रभावी काम करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना करत आहेत.

जयंत पाटील यांनी तालुकाध्यक्ष ते बुथ अध्यक्षांशी संवाद साधत दोन्ही मतदारसंघाची माहिती घेतली. यावेळी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीही समजून घेतल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, जयसिंगराव गायकवाड, जीवन गोरे, माजी आमदार राहूल मोटे, आमदार विक्रम काळे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, महिला निरीक्षक प्रज्ञा खोसरे, युवक जिल्हा अध्यक्ष आदित्य गोरे, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा माडजे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश सांळूखे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही, जयंत पाटलांचा टोला

पडळकर म्हणतात पुण्यातील गर्दीसाठी अजित पवारांवर गुन्हा नोंदवा, जयंत पाटील म्हणाले, दादांनी…

राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार झोकून देऊन काम करेल, जयंत पाटलांचा जनतेला विश्वास

व्हिडीओ पाहा :

Jayant Patil started NCP organization strengthening tour from Osmanabad

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI