कास पठारावरील फुलं पाहाला जाताय? 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरु, बुकिंग नसल्यास नो एन्ट्री

गेल्या वर्षी कोरोनामुळे घरातच बसून राहिल्या ने पर्यटकांची पावले आता हळूहळू पर्यटनस्थळ शोधायला लागली आहे. त्यातच कास म्हणजे पर्यटनाची पर्वणी असल्याने पर्यटक या पठाराला प्रथम पसंती देत असतात.

कास पठारावरील फुलं पाहाला जाताय? 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरु, बुकिंग नसल्यास नो एन्ट्री
कासवरील फुले (साभार कास नोंदणी वेबसाईट)
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 7:46 AM

सातारा: जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील कास पठारावर येणाऱ्या रंगीबेरंगी फुलांचे गालिचे पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात.मागील वर्षी कोरोनाच्या सावटाखाली सर्वत्र पर्यटन बंद होते त्यामुळे कास पठार सुद्धा पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. आता या वर्षी 25 ऑगस्ट पासून हे पठार पर्यटकांच्या साठी खुलं करण्यात आले आहे. मात्र, ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय पठारावर प्रवेश दिला जाणार नाही. पर्यटकांना वनविभागाच्या https://www.kas.ind.in/ या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल.

ऑनलाईन बुकिंगसाठी 100 रुपये शुल्क

सध्या हंगामाची सुरवात असल्याने सध्या अगदी तुरळक प्रमाणात फुले येथे आलेली पाहायला मिळत आहेत.या पठारावर येण्यासाठी ऑनलाइन बुकिंग असून प्रत्येक व्यक्तीला 100 रु तिकीट काढावे लागते. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केले नसेल त्यांना जागेवर सुद्धा बुकिंग करता येणार आहे. सध्या या पठारावर चवर या प्रजातीची पांढऱ्या रंगाची फुले मोठ्या प्रमाणात आली आहेत. परंतु इतर फुलांचा बहार येण्या साठी साधारण आणखी काही दिवसांची लोकांना वाट पाहावी लागणार आहे.

कासचा हंगाम सुरू झाल्यापासून कासला पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.परंतु, कमी प्रमाणात आलेल्या फुलांच्या बहार पाहून पर्यटकांचा हिरमोड होत आहे.त्यामुळे आलेले पर्यटक सध्या पठारावरील नयनरम्य वातावरणाचा आनंद घेत आहेत.येत्या पंधरा दिवसात या फुलांचा बहार वाढल्यावर पुन्हा पर्यटक कास ला भेट देतील. परंतु, सध्या पर्यटकांना फुलांचा बहार पाहायला न मिळाल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

कासला पर्यटकांची पहिली पसंती

गेल्या वर्षी कोरोनामुळे घरातच बसून राहिल्या ने पर्यटकांची पावले आता हळूहळू पर्यटनस्थळ शोधायला लागली आहे. त्यातच कास म्हणजे पर्यटनाची पर्वणी असल्याने पर्यटक या पठाराला प्रथम पसंती देत असतात.कास पुष्प पठार लोकांना पाहण्यासाठी खुलं झालं असल तरी पठाराचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कास परिसर दर्शन बससेवा

कास पुष्प पटार पाहायला येणाऱ्या पर्यटकांसाठी पठारावरील पार्किंगपासून बससेवा उपलब्ध आहे. कास परिसर दर्शनमध्ये घाटाई देवी मंदिर, कास तलाव, वजराई धबधबा आणि कोयना धरण बॅक वॉटर, सह्याद्रीनगर, एकीव धबधबा आणि नवरानवरीचा डोंगर ही ठिकाण पाहता येतात.

इतर बातम्या:

Video : विरोधक म्हणतात हे सरकार तीन चाकी रिक्षा, अजित पवारांनी चक्क इलेक्ट्रीक रिक्षाच चालवून बघितली!

केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करते हा काय प्रश्न आहे का?, लढलेंगे इससे भी; सुप्रिया सुळे आक्रमक

Kaas Plateau flower season visits started for tourist online registration starts from 1 September

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....