बारामती : इंधनाचे दर गगनाला भिडले असताना आता इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जातोय. या पार्श्वभूमीवर आता वाहन निर्मिती कंपन्यांकडूनही आता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीवर भर दिला जात आहे. उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रिक रिक्षाचं हँडल हाती घेतलं. अजितदादांनी ही रिक्षा चालवली आणि राज्यभरात या रिक्षा राईडची चर्चा रंगली. अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी जानाई उजव्या कालव्याच्या पाईपलाईनचं भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. तसंच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या ‘मॅग्नेट’ प्रकल्पातंर्गत राज्यातील पहिल्या फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचे भूमीपूजन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार जळोची येथे अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या दौऱ्यात अजित पवार यांनी पियाजो कंपनीलाही भेट दिली. (Ajit Pawar drove an electric rickshaw of Piaggio Company)