महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा धोका, कर्नाटक सीमेवर निर्बंध वाढवले

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा धोका, कर्नाटक सीमेवर निर्बंध वाढवले
फोटो : पीटीआय, प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंट (Delta Plus Variant) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. नव्या व्हायरसचा फैलाव महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये होऊ नये यासाठी कर्नाटक प्रशासन आणि सीमाभागात कडक निर्बंध सुरू केलेत.

भूषण पाटील

| Edited By: चेतन पाटील

Jun 30, 2021 | 9:45 PM

कोल्हापूर: महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंट (Delta Plus Variant) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. नव्या व्हायरसचा फैलाव महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये होऊ नये यासाठी कर्नाटक प्रशासन आणि सीमाभागात कडक निर्बंध सुरू केलेत. तपासणी अहवाल,कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातील वाहन आणि प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश नाकारण्यात आलाय.इतकंच नाहीतर हे दोन्ही निकष नसणाऱ्या प्रवाशांची कोगनोळी टोल नाक्यावरच रॅपिड टेस्ट केली जातेय. ही टेस्ट निगेटिव्ह असेल तरच पुढे प्रवेश केला जातोय अन्यथा प्रवाशांना माघारी पाठवले जातेय. (Karnataka Government alert due to increasing Delta Plus Variant in Maharashtra)

कर्नाटक सरकारकडून निर्बंधात वाढ

कर्नाटक परिवहन विभागानं बेळगाव मधून सांगली आणि साताराकडे येणाऱ्या बस देखील काही काळासाठी थांबवल्या आहेत. एका बाजूला कर्नाटक सरकार इतकी खबरदारी घेत असताना महाराष्ट्रातील प्रशासन मात्र अजूनही याबाबतीत गांभीर्याने कारवाई करत नसल्याचे दिसतंय. कारण कोगनोळी टोल नाक्या पासून काही अंतरावर असलेल्या कागल चेक पोस्ट याठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून फक्त पोलिसांकडूनच कर्नाटक कडून येणाऱ्या वाहनांची तपासणी होतेय.

हसन मुश्रीफ यांच्या आदेशाला प्रशासनाची केराची टोपली

आरोग्य विभागाचे कोणतीही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाहीत किंबहुना रॅपिड अँटीजेनॉची कोणतीही सोय इथं उपलब्ध नाही. कालच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या चेक पोस्टवर तपासणी केल्याशिवाय प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश देऊ नका अशा सक्त सूचना दिल्या आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मात्र मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

डेल्टा प्लसपासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, या गोष्टी केल्यास आपण डेल्टा प्लसपासून बचाव करु शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

संबंधित बातम्या:

कोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय? कशी घ्याल स्वतःची काळजी?

नवी मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण?

(Karnataka Government alert due to increasing Delta Plus Variant in Maharashtra)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें