AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकाच्या लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत 22 जोडप्यांचा विवाह, लातूरमध्ये अनोख्या सोहळ्याची चर्चा

लातूर मध्ये एक अविस्मरणीय विवाह सोहळा पार पडलाय. एका पित्याने आपल्या मुलाच्या लग्नावरील अनावश्यक खर्च टाळत चक्क 22 जोडप्यांचे विवाह स्वखर्चाने लावून दिले आहेत.

लेकाच्या लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत 22 जोडप्यांचा विवाह, लातूरमध्ये अनोख्या सोहळ्याची चर्चा
सामुदायिक विवाह सोहळा
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 11:35 AM
Share

लातूर : लातूर मध्ये एक अविस्मरणीय विवाह सोहळा पार पडलाय. एका पित्याने आपल्या मुलाच्या लग्नावरील अनावश्यक खर्च टाळत चक्क 22 जोडप्यांचे विवाह स्वखर्चाने लावून दिले आहेत.एव्हढेच नाही तर या नवविवाहिताना संसार उपयोगी साहित्यही भेट म्हणून दिले आहे.या विवाहाची सध्या लातूरमध्ये चर्चा आहे.

हे आहेत लातुरचे सामाजिक कार्यकर्ते सरफराज मणियार, सरफराज यांच्या मुलाचा विवाह ठरला, त्यावेळीच त्यांनी आपल्या मुलाच्या विवाह सभारंभा वरील अनावश्यक खर्च टाळून चांगला उपक्रम राबवायचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी मुस्लिम समाजातल्या 22 जोडप्यांचे विवाह स्वखर्चाने लावून दिले आहेत.

सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून विवाह सोहळ्याचं आयोजन

या सामूहिक विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च सरफराज मणियार यांनी केला आहे. मणियार हे शेतकरी आणि बांधकाम व्यवसायिक आहेत ,सामाजिक बांधिलकीने ते अनेक उपक्रम राबवत असतात.आपल्या मुलाच्या विवाहाच्या निमित्ताने त्यांनी या 22 जोडप्यांच्या विवाहाचा राबवलेला उपक्रम देखील कौतुकास्पद आहे.

रिसेप्शनचा खर्च टाळून विवाह सोहळा

सरफराज मणियार यांनी त्यांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये होणारा अनावश्यक खर्च टाळून 22 जोडप्यांचं लग्न लावून दिलं आहे. गरीब असो की श्रीमंत असो मुस्लीम धर्मात साधारणपणानं लग्न लावावं असं सांगितलं जातं. गरीब, असो मध्यमवर्गीय लोकं आमच्याकडं आली त्यांची लग्न लावून दिली आहेत. जिल्ह्याबाहेरील लोक देखील सामुदायकि विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. अनावश्यक खर्च टाळून हा कार्यक्रम राबवण्यात आला. मुलानं सांगितल्याप्रमाणेच सामुदायिक विवाह सोहळा राबवल्याचं सरफराज मणियार यांनी सांगितलंय.

इतर बातम्या:

मुंबई महापालिकेचा पैसा शिवसेना पक्षनिधी म्हणून वापरतेय, बाळा नांदगावकर यांचं सनसनाटी पत्र

कर्जत जामखेडकरांची अवस्था म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं, सांगताही येईना, बोलताही येईना, राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

Latur Sarfraj Maniyar organized collective marriage of 22 couples

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.