VIDEO | फेसाळ पाण्यावर मखमली चादर, मालवण समुद्रकिनाऱ्यावरील नयनरम्य नजराणा

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि खवळलेला समुद्राच्या जोरदार लाटा किनारपट्टी धडकत होत्या. त्यातूनच हा नयनरम्य नजराणा तयार झाला. (Malvan beach Velvet sheet of foam water wonderful view of nature)

VIDEO | फेसाळ पाण्यावर मखमली चादर, मालवण समुद्रकिनाऱ्यावरील नयनरम्य नजराणा
Malvan beach rock garden


मालवण : गेल्या दोन दिवस कोकणात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात समुद्रकिनारी लाटांचं तांडव सुरु होतं. मात्र गेल्या काही तासांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मालवण समुद्र किनारी निसर्गाचा अद्भूत नजारा पाहण्यास मिळत आहे. (Malvan beach Velvet sheet of foam water wonderful view of nature)

सिंधुदुर्गातील रॉक गार्डन येथील किनारपट्टी भागात फेसाळ पाण्याची मखमली चादर पसरली आहे. त्यामुळे एक अनोखं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि खवळलेला समुद्राच्या जोरदार लाटा किनारपट्टी धडकत होत्या. त्यातूनच हा नयनरम्य नजराणा तयार झाला.

निसर्गाचा नयनरम्य नजराणा

फेसाळ पाण्याने जणू बर्फ पडावा अथवा कापूस पिंजावा अशी मखमली चादर या किनाऱ्यावर पसरली आहे. कोरोना काळ असल्याने सध्या सिंधुदुर्गात पर्यटकांवर निर्बंध लावण्यात आले आहे. अन्यथा निसर्गाचा हा नयनरम्य नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली असती. मात्र सध्या स्थानिक या नजाऱ्याचा लाभ घेत आहेत.

पाहा व्हिडीओ :

(Malvan beach Velvet sheet of foam water wonderful view of nature)

संबंधित बातम्या : 

पंढरपूरच्या मजूर दाम्पत्याच्या मुलाची उंच भरारी, इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञपदी निवड

मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

CCTV VIDEO | गोळी झाडून मुलाची हत्या, नवी मुंबईतील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा प्रताप सीसीटीव्हीत कैद

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI