CCTV VIDEO | गोळी झाडून मुलाची हत्या, नवी मुंबईतील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा प्रताप सीसीटीव्हीत कैद

निवृत्त पोलीस अधिकारी भगवान पाटीलने आपल्या दोघा मुलांवर रिव्हॉल्वरने गोळीबार केला होता. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे

CCTV VIDEO | गोळी झाडून मुलाची हत्या, नवी मुंबईतील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा प्रताप सीसीटीव्हीत कैद
भगवान पाटीलने मुलांवर केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज


नवी मुंबई : निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने मुलांवर केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे. गाडीच्या सर्व्हिसिंगच्या पैशांवरुन बाप-लेकामध्ये वाद झाला होता. त्यानंतर संतापाच्या भरात भगवान पाटीलने मुलांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. मोठा मुलगा विजय पाटीलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर धाकटा मुलगा सुजय पाटील जखमी आहे. (Navi Mumbai Retired Police officer Bhagwan Patil fires on Sons caught in CCTV)

निवृत्त पोलीस अधिकारी भगवान पाटीलने गुन्हा मान्य केला आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भगवान पाटीलने मुलांवर गोळीबार केला होता. जखमी अवस्थेत दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले होते, परंतु गंभीर जखमी झालेला मोठा मुलगा विजय पाटीलचे इंद्रावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर जखमी सुजयवर उपचार सुरु आहेत.

नेमका प्रकार काय आहे?

भगवान पाटील हे निवृत्त पोलीस अधिकारी नवी मुंबईतील ऐरोली भागात राहतात. त्यांचा मुलगा विजय पाटील वसईला राहत होता. तुला गिफ्ट द्यायचे आहे असे सांगून भगवान पाटील यांनी त्याला घरी बोलावले. मुलगा घरी आल्यानंतर भगवान पाटील यांनी विजय आणि धाकटा मुलगा सुजय पाटील या दोघांवर रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडल्या. यामध्ये विजयच्या पोटात आणि खांद्यावर एक-एक गोळी लागली. तर एक गोळी हाताला घासून गेली. तर सुजयच्या अंगालाही एक गोळी घासून गेली. यावेळी भगवान पाटीलने आपल्या पत्नीलाही मारहाण केली होती.

आधीही भगवान पाटील यांच्याकडून असेच कृत्य

भगवान पाटील हे माजी नगरसेवक राजू पाटील यांचे नातेवाईक आहेत. भगवान पाटील यांनी याआधीही अशाच प्रकारचे कृत्य केलेले आहे. त्यांनी राजू पाटील यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखली होती. या प्रकारामुळे तक्रार दाखल केल्यानंतर भगवान पाटील यांच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली होती. मात्र, आता रिव्हॉल्वहर परत मिळाल्यानंतर भगवान पाटील यांनी आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्या आहेत. या प्रकारामुळे सध्या नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

गिफ्ट द्यायच्या बहाण्याने घरी बोलावलं, नंतर मुलावरच झाडल्या तीन गोळ्या, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्याने नवी मुंबई हादरली

(Navi Mumbai Retired Police officer Bhagwan Patil fires on Sons caught in CCTV)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI