शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांची माहिती एका क्लिकवर मिळणार, नवं पोर्टल सुरु होणार

राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये दररोज उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची एकत्रित माहिती मिळण्यासाठी आता पोर्टल तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांची माहिती एका क्लिकवर मिळणार, नवं पोर्टल सुरु होणार
अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य मंत्री
महेंद्र जोंधळे

| Edited By: Yuvraj Jadhav

Oct 05, 2021 | 3:40 PM

लातूर: राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये दररोज उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची एकत्रित माहिती मिळण्यासाठी आता पोर्टल तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासन तयार करत असलेल्या पोर्टलचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फायदा होईल. वैद्यकीय शिक्षण विभागानं अमित देशमुख यांच्यासमोर सादरीकरण केलं असून येत्या काही दिवसांमध्ये पोर्टल सुरु होणार आहे.

पोर्टलचं नाव काय?

“पेशंट मॉनिटरिंग अँड क्लिनिकल फ्लॅटफॉर्म ” असं या पोर्टलचे नाव असेल असं वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रसिद्धीस दिले आहे. या पोर्टलचे सादरीकरण आज वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या समोर करण्यात आले.

पोर्टल सुरु करण्याचा उद्देश

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची एकत्रितपणे माहिती मिळावी,विद्यार्थ्यांना संशोधनाकरिता मदत व्हावी या दृष्टीने एक पोर्टल तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री देशमुख यांनी दिली.

रुग्णांची माहिती एकत्रित होणार

“पेशंट मॉनिटरिंग अँड क्लिनिकल फ्लॅटफॉर्म ” असं या पोर्टलचे नावानं पोर्टल सुरु झाल्यानंतर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची माहिती एकत्रित होणार आहे. संपूर्ण राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांची माहिती एकत्र झाल्यानं वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला वाव मिळणार आहे. याशिवाय राज्यातील रुग्णांच्या आजारांची एकत्रित माहिती वैद्यकीय विभागाकडं उपलब्ध होईल.

पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये समावेश

पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी या अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये करण्यात यावा असे निर्देश आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

इतर बातम्या:

मी विधान परिषदेचा सदस्य, त्यात मुख्यमंत्री आणि माझा मतदारसंघ हे संपूर्ण राज्य: उद्धव ठाकरे

Priyanka Gandhi | काँग्रेस महासचिव प्रियंका गांधीना उत्तर प्रदेश पालिसांनी केली अटक

Medical Education Minister Amit Deshmukh said Patient Monitoring and Clinical Platform portal will start soon

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें