AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुटुंबातील सदस्यांकडून आईची हत्या, अखेर नातवाच्या चिकाटीमुळे खूनाचा गुन्हा दाखल

जिल्हा सत्र न्यायालयाने शिंदे यांच्या तक्रारीची दखल घेऊन तीन महिन्याच्या आत या प्रकरणाचा तपास करून हत्येप्रकरणी पाच आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले होते.

कुटुंबातील सदस्यांकडून आईची हत्या, अखेर नातवाच्या चिकाटीमुळे खूनाचा गुन्हा दाखल
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 6:57 PM
Share

इचलकरंजी : कुटुंबातील सदस्यांकडूनच आईचा छळ करुन तिची हत्या झाल्याची दुर्दैवी घटना हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावामध्ये घडली होती. मात्र पोलिसांनी या घटनेबाबत किरकोळ स्वरुपाचा गुन्हा दाखल करीत आकस्मित निधनाची नोंद केली होती. मात्र नातवाच्या पाठपुराव्यामुळे गुन्ह्याची उकल झाली असून याबाबत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले. हिराबाई नाईक असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे हातकणंगले परिसरात खळबळ माजली आहे.

न्यायासाठी नातवाची जिल्हा सत्र न्यायालयात धाव

हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावामध्ये हिराबाई नाईक आपल्या कुटुंबासोबत राहतात. हिराबाई यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांचा छळ करीत असत. काही दिवसांपूर्वी हिराबाईंचा छळ करीत कुटुंबातील सदस्यांकडून त्यांची हत्या करण्यात आली. मात्र याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी गंभीर दखल घेतली नाही. उलट नाईक कुटुंबातील आरोपी असलेल्या पाच सदस्यांना पोलिसांनी अभय दिले. हिराबाईंच्या मृत्यूप्रकरणी किरकोळ गुन्हा दाखल करीत आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र हिराबाई यांचा नातू राजू शिंदे यांनी हातकणंगले पोलिसांना आजीचे निधन आकस्मित नसून हत्या आहे असे सांगितले. मात्र पोलिसांनी शिंदे यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करीत केवळ जबर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पोलीस प्रतिसाद देत नसल्याने शिंदे यांनी न्याय मिळवण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

न्यायालयाच्या आदेशानंतरही आठ दिवसांनी गुन्हा दाखल

जिल्हा सत्र न्यायालयाने शिंदे यांच्या तक्रारीची दखल घेऊन तीन महिन्याच्या आत या प्रकरणाचा तपास करून हत्येप्रकरणी पाच आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले होते. पण पोलिसांनी न्यायालयाचे आदेश असतानासुद्धा या प्रकरणी तात्काळ दखल न घेता आठ दिवसांनी 302 चा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या रूकडी गावामध्ये बिनदिक्कतपणे फिरत आहेत. पोलिसांच्या या भूमिकेमुळे नाईक आजीला न्याय मिळणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. (Mother killed by family members in Ichalkaranji)

इतर बातम्या

अमेझॉन आणि फ्युचर ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईडीचे समन्स, आवश्यक कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश

बारमालकांनो सावधान! बिल मागितले म्हणून बार पेटविण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून लावली आग

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.