Nanded | चंद्रकांत पाटील यांना साडी, चोळीसह बांगड्याचा आहेर! नांदेडमधील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक

| Updated on: May 29, 2022 | 10:53 AM

ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य समस्थ महिला वर्गाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. एका लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे ही खेदाची बाब असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.

Nanded | चंद्रकांत पाटील यांना साडी, चोळीसह बांगड्याचा आहेर! नांदेडमधील राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक
Follow us on

मुंबई : राजकीय ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्याचदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात विविध शहरांमध्ये आंदोलने (Movement) करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. इतकेच नव्हेतर चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल झालीये. तर पाटील यांना याप्रकरणी राज्य महिला आयोगाने खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. आता याचसंदर्भात नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला आघाडीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलय.

महिला कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी

मंत्रालयावर काढलेल्या मोर्चात चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना घरी जाऊन स्वयंपाक करा, तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या असे म्हटलं होते. त्याच्या याच विधानाच्या विरोध नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आले. सुप्रिया सुळे यांना घरी जाऊन स्वयंपाक करण्याचा सल्ला दिल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांना साडी चोळी आणि बांगड्याचा आहेर करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेची प्रतीकात्मकरित्या ओटी भरत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलय. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करत चंद्रकांत पाटील यांचा निषेध नोंदवलाय.

हे सुद्धा वाचा

प्रकरण थेट आता महिला आयोगाकडे

ओबीसी आरक्षण आंदोलनाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य समस्थ महिला वर्गाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. एका लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे ही खेदाची बाब असल्याचेही आयोगाने म्हटले आहे. नांदेडच नाहीतर राज्याच्या विविध भागांमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध हा केला जातो आहे. आता हे प्रकरण थेट महिला आयोगाकडे पोहोचले आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे म्हटले आहे.