शहीद सुभेदार विजय शिंदे यांच्यावर आज अंत्यसंस्कार! वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव एकवटला

शहीद सुभेदार विजय शिंदे यांच्यावर आज अंत्यसंस्कार! वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव एकवटला

सध्या संपूर्ण गावामध्ये दुखाचे वातावरण बघायला मिळते आहे. अंत्ययात्रा मार्गावर श्रध्दांजलीचे बॅनर ठिक ठिकांनी लावण्यात आले असून रांगोळी आणि सडे रस्त्यावर टाकण्यात आले आहेत. आता समस्त गावकरी पार्थिवाची प्रतिक्षा करत आहेत. विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे यांनीही लष्करात सेवा बजावली होती. तर त्यांचे मोठे भाऊ प्रमोद शिंदे हे लष्करात पैरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत.

दिनकर थोरात

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 29, 2022 | 10:01 AM

मुंबई : लडाखमध्ये झालेल्या अपघातामध्ये सात जवानांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये विसापूर खटाव येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे (Vijay Shinde) यांचा समावेश आहे. देशसेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. या घटनेमुळे खटाव तालुका दुखात बुडाला आहे. शहिद सुभेदार विजय शिंदे यांच्या अंतिम संस्काराची तयारी पुर्ण झाली असून विसापुर सातारा या त्याच्या गावी लष्करी इतमामाने अंत्यसंस्कार (Funeral) होणार आहेत. शहिद सुभेदार विजय शिंदे यांच्याच शेतात अंत्यसंस्कारासाठी चबुतरा तयार केला असुन पार्थिव येताच गावातुन अंत्ययात्रा काढण्यात येईल. विजय सर्जेराव शिंदे हे सन 1998 मध्ये 22 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लष्करी सेवेत (Military service) रुजू झाले होते.

श्रध्दांजलीचे बॅनर संपूर्ण गावामध्ये

24 वर्षाच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाचे संरक्षण केले. सध्या संपूर्ण गावामध्ये दुखाचे वातावरण बघायला मिळते आहे. अंत्ययात्रा मार्गावर श्रध्दांजलीचे बॅनर ठिक ठिकांनी लावण्यात आले असून रांगोळी आणि सडे रस्त्यावर टाकण्यात आले आहेत. आता समस्त गावकरी पार्थिवाची प्रतिक्षा करत आहेत. विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे यांनीही लष्करात सेवा बजावली होती. तर त्यांचे मोठे भाऊ प्रमोद शिंदे हे लष्करात पैरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत. 26 जवानांचे परतापूरच्या संक्रमण शिबिरातून उपसेक्टर हनिफच्या फॉरवर्डकडे जात असताना लष्कराचे वाहन रस्त्यावरून घसरून श्योक नदीत पडले.

हे सुद्धा वाचा

कोल्हापूर जिल्ह्याही शोकसागरात बुडाला

या अपघातात सात सैनिकांचा मृत्यू झाला आणि सोळा जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशांत जाधव यांचाही याच अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. शहीद प्रशांत जाधव यांचे पार्थिव उद्या खास विमानाने बेळगांव येथे आणण्यात येणार असून बसर्गेत त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रशांत यांचे लग्न जानेवारी 2020 मध्ये झाले होते . त्यांना एक वर्षाची मुलगी आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें