Nandurbar | पोलीस दलाने पुढाकार घेत विद्यार्थ्यांना बांधून दिला लोखंडी पुल, पुराच्या पाण्यातून धोकादायक पध्दतीने विद्यार्थ्यांना करावा लागत होता प्रवास…

| Updated on: Aug 16, 2022 | 11:24 AM

धडगाव तालुक्यातील कालेखेत पाडाच्या शाळेवर येणाऱ्या आजुबाजुच्या पाड्यावरील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून अत्यंत धोकादायक पध्दतीने ये जा करावी लागत होती. शाळेत येतांना दोरीच्या सहाय्याने मोठी कसरत करावी लागत होती.

Nandurbar | पोलीस दलाने पुढाकार घेत विद्यार्थ्यांना बांधून दिला लोखंडी पुल, पुराच्या पाण्यातून धोकादायक पध्दतीने विद्यार्थ्यांना करावा लागत होता प्रवास...
Follow us on

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात धडगाव तालुक्यातील उमराणी गावाअंतर्गत येणाऱ्या कालेखेतपाड्याच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जाताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागतं. शाळेमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागत होता. शाळेत (School) विद्यार्थ्यांना गुडघ्याभर पाण्यातून जावे लागत असतं. मात्र, जिल्हा पोलिस दलाने याची दखल घेत याठिकाणी विद्यार्थ्यांच्या सोईसाठी लोखंडी पुल बसवला आहे. यामुळे शाळेमध्ये जाण्यासाठी धोकादायक (Dangerous) पध्दतीने प्रवास करण्याचे संकट दूर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळते आहे.

पुराच्या पाण्यातून अत्यंत धोकादायक पध्दतीने विद्यार्थ्यांना करावा लागत होता प्रवास

धडगाव तालुक्यातील कालेखेत पाडाच्या शाळेवर येणाऱ्या आजुबाजुच्या पाड्यावरील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून अत्यंत धोकादायक पध्दतीने ये जा करावी लागत होती. शाळेत येतांना दोरीच्या सहाय्याने मोठी कसरत करावी लागत होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून जिल्हात सतत पाऊस पडत असल्याने पुराच्या पाण्याच्या धोकाही वाढला असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नव्हते.

हे सुद्धा वाचा

12 पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी याठिकाणी श्रमदान करत पुल उभारला

पुराच्या पाण्यातून जाताना साप आणि विंचु चावण्याच्या भितीमुळे अनेक विद्यार्थ्यांची शाळा बंद होण्याची वेळ देखील आली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या या समस्येकडे दुर्लक्ष केले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस दलाने पुढाकार घेत याठिकाणी छोटेखानी लोखंडी पुल बांधला आहे. दोन शालेय विद्यार्थी आणि पोलीस अधिक्षकांनी या पुलाची फित कापुन उदघाटन केले. जवळपास सहा दिवस बाराहुन अधिक पोलीस कर्मचाऱयांनी याठिकाणी श्रमदान करत हा पुल उभा केला आहे.