तर ‘प्रहार’मधून घणाघात करेन, गप्प बसणार नाही; नारायण राणेंचा निर्वाणीचा इशारा

जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. (Narayan Rane threatens to 'expose' Shiv Sena and Sanjay Raut)

तर 'प्रहार'मधून घणाघात करेन, गप्प बसणार नाही; नारायण राणेंचा निर्वाणीचा इशारा
narayan rane

सिंधुदुर्ग: जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. वैयक्तिक टीका करणं थांबवा अन्यथा प्रहामधून लिहायला सुरुवात करेन. मी गप्प बसणार नाही, असा निर्वाणीचा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. (Narayan Rane threatens to ‘expose’ Shiv Sena and Sanjay Raut)

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. मी शेवटी एवढेच म्हणेल की आता हे सर्व बस्स करा. जर संजय राऊत यांनी हे थांबवले नाही तर मी पण प्रहारमधून सुरु करेल. कोण कुठे बसतो, काय करतो याचा गौप्यस्फोट करेल, असा इशारा राणे यांनी दिला. अनिल परब कितीही लपून काहीही करत असले तरी त्यांचे कारनामे कॅमेऱ्यावर आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

तोंडावर भेटल्यावर चांगलं बोलतात…

या दौऱ्यामध्ये अपशकुन आले. एक मांजर आडवी आली. मात्र मी त्याकडे लक्ष देत नाही. त्यांनी सामनातून अग्रलेख लिहिले. आमच्या मुलावर बोलले. माझी दोन्ही मुलं चांगली आहेत. मात्र तुमच्या मुलांचे पराक्रम आधी बघा. मग आमच्यावर बोला, असा दमच राणेंनी भरला. तोंडावर भेटल्यावर चांगले बोलायचं. लेखणी हातात आली आणि वरुन फोन आला तर ये रे माझ्या मागल्या करायचं हे धंदे सोडा, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.

शिवसैनिकांनी कलटी मारली

शिवसैनिकांनी रथयात्रा थांबवण्याचा प्लान होता. पण 12 ते 15 लोकच समोर दिसले. माझी गाडी आली तेव्हा शिवसैनिकांनी कलटी मारली. राणेंवर बोलल्याने पद मिळतात म्हणून सर्व सुरू झालं आहे. अशा लोकांनी गप्प रहावे. मला माझे काम करु द्या. काही लोक मला खिश्यात ओढायला पाहतात, माझ्या हातून काही चूक होईल पण असं होणार नाही. मी गप्पही बसणार नाही, असं ते म्हणाले.

तेव्हा मीच सोबत होतो

बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलावले होते. साहेब अज्ञातस्थळी असताना मी त्यांच्याबरोबर होतो. त्यांनी मुलाला सोबत घेतलं नव्हतं, असंही ते म्हणाले.

शिवसैनिकांचे काम करणार

महाराष्ट्राचे कुठलेही काम असेल तर मी ते करेल. उद्या एखादा शिवसैनिक जरी माझ्याकडे एखादी स्किम घेऊन आला तरी मी काम करेन. कारण शेवटी तो देशाचा नागरिक आहे, असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीकडे अजून वळलोच नाही

यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली. अजित पवारांनी नको त्या गोष्टीत लक्ष देऊ नये. त्यांनी त्यांचं खातं पाहावं. मी अजून राष्ट्रवादीकडे वळलोच नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (Narayan Rane threatens to ‘expose’ Shiv Sena and Sanjay Raut)

 

संबंधित बातम्या:

100 कोटी वसुलीत अनिल देशमुखांची भूमिका नसल्याचा सीबीआयचा अहवाल, मग कारवाई कुणाच्या इशाऱ्यावर? : सचिन सावंत

राज्यात कायद्याचं राज्य आहे तर अनिल परब यांना स्वत:हून अटक करा; चंद्रकांतदादांचा पलटवार

VIDEO: शिवसेना-भाजपमध्ये कोण दुरावा निर्माण करतंय?; संजय राऊतांकडून पहिल्यांदाच नाव जाहीर

(Narayan Rane threatens to ‘expose’ Shiv Sena and Sanjay Raut)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI