Maratah Reservation: ‘मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे’

नक्षलवाद्यांना अचानक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात रस का वाटू लागला आहे, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. | Maratha Reservation

Maratah Reservation: 'मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे'
मराठा आंदोलन

गडचिरोली: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा एक पत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाने (Maratha Reservation) दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा दिला आहे. भाकपा माओवादी कमिटी सचिव सह्याद्रीने हे पत्रक काढले आहे. नक्षलवाद्यांच्या या पत्रकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. (Naxals in Gadchiroli issues note regarding Maratha Reservation)

मात्र, हे पत्रक खरंच नक्षलवाद्यांकडून जारी करण्यात आले आहे का, याबाबत अद्याप साशंकता आहे. हे पत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांची असलेली दहशत पाहता खोटे पत्रक काढण्याची हिंमत कोणीही करणार नाही, असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, नक्षलवाद्यांना अचानक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यात रस का वाटू लागला आहे, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द ठरवले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा मोर्चाचे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रमुख मराठा नेते आणि मराठा क्रांती मोर्चेकऱ्यांच्या हालचाली सुरु आहेत.

नक्षलवाद्यांना कळालं ते सरकारला का कळत नाही: मेटे

नक्षलवाद्यांच्या पत्रकावर विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे नक्षलवाद्यांना कळलं ते सरकारला का कळत नाही. मराठा समाजाची दुर्दैवी अवस्था झालीय हे नक्षलवाद्यांना कळलं आहे. ते सरकारला कधी कळणार, असा प्रश्न विनायक मेटे यांनी उपस्थित केला

‘संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात चालढकल केली तर मराठा समाजाचं नुकसान, सरकारला पळवाट देऊ नका’

सध्या राज्यातील मराठा आंदोलनाचे नेतृत्व संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे आहे. मात्र, राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजप त्यांच्या भूमिकेशी सहमत नाही. संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करत असतील तर ती गोष्ट ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. मात्र, यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. संभाजीराजे यांनी चालढकल केली तर भाजप जो कोणी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी पुढाकार घेईल, त्याच्या पाठिशी उभा राहील, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

ते शुक्रवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांना संभाजीराजे राज्य सरकारला वेळ देत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, मराठा मोर्चा काढण्यात चालढकल झाली तर ती बाब ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. त्यानंतर मराठा आंदोलनाचं नेतृत्व दुसऱ्या कोणाकडे जाईल किंवा काय होईल, ते माहिती नाही. मात्र, वेळ निघून गेल्यास मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल. संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी तर मिळणार नाही ना, याचा विचार संभाजीराजे यांनी केला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

संभाजीराजे छत्रपती  कोपर्डीत; मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरणार

‘संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात चालढकल केली तर मराठा समाजाचं नुकसान, सरकारला पळवाट देऊ नका’

संभाजीराजे आणि उदयनराजेंच्या नेतृत्वात सोलापुरात तिसरा मराठा मोर्चा निघणार?

(Naxals in Gadchiroli issues note regarding Maratha Reservation)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI