या वसतिगृहाच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह, गोरगरीब विद्यार्थ्यांचा कसा होईल फायदा?

आदिवासी भागासाठी वसतिगृहाची योजना आहे. पण, याचा योग्य प्रमाणात प्रचार-प्रसार झाला नाही. पत्रकांत फक्त चार दिवसांचा वेळ दिला आहे.

या वसतिगृहाच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह, गोरगरीब विद्यार्थ्यांचा कसा होईल फायदा?
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 2:40 PM

गडचिरोली : गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन शिक्षणाची प्रगती व्हावी. या उद्देशाने शासनाने नेताजी सुभाष चंद्र बोस वसतिगृह प्रवेश सुरू केले. पण, यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सिरोंचा तालुका हा अतिदुर्गम अति संवेदनशील भागात मोडला जातो. या भागातील झिंगानुर कोर्ला कोपेला, पातागुडम, अमडेली, चीटुर, रामशीगुडम, सोमनपली, वेनलाया टेकडा, मोयबिनपेठा, रेगुंटा या भागातील विद्यार्थी सिरोंचा येथे शिक्षण घेतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी नाही असे विद्यार्थी सिरोंचा तालुका मुख्यालय येऊन शिक्षण घेतात.

पत्रकात स्पष्ट उल्लेख नाही

नेताजी सुभाष चंद्र बोस आवास मुलांचे वसतिगृह सुरू करण्यात आले. परंतु ज्या प्रकारे प्रचार किंवा प्रसार व्हायला पाहिजे तसा पंचायत समितीला शिक्षणधिकारी किंवा संबंधित मुख्याध्यापकांनी केलाच नाही. या वसतिगृहात कोणत्या जातीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार स्पष्ट उल्लेख या पत्रकात नाही.

गट्टा एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या तीन ठिकाणी हे वसतिगृह सुरु करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांचे पालकत्व नाही किंवा कोरोना काळात ज्या विद्यार्थ्यांनी आपले पालकत्व गमावले अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची एक सुविधा म्हणून हे वसतिगृह सुरू करण्यात आले. उच्च प्राथमिक शाळेतील अनेक निकाल एक मे रोजी जाहीर होतात. तर 15 एप्रिल शेवटची तारीख म्हणून शिक्षण विभागाने कसा उल्लेख केला, असाही प्रश्न उपस्थित होतो.

हे सुद्धा वाचा

चार दिवसांची मुदत पुरेसी आहे का?

आज 11 तारखेला पत्रक काढून चार दिवसांची मुदत देण्यात आली. 15 एप्रिल या तारखेला शेवटची तारीख असा यात उल्लेख करण्यात आलेला आहे. या चार दिवसात वर उल्लेख केलेल्या दुर्गम भागापर्यंत हा पत्रक पोहोचेल का असा प्रश्न निर्माण होतो. दुर्गम भागात दूरध्वनी सेवा किंवा इंटरनेट सुविधा बरोबर उपलब्ध राहत नाही.

gadchiroli 2 n

दुर्लक्ष कुणाचे

मॉडेल स्कूलच्या मुख्याध्यापक किंवा शिक्षणाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गरजू विद्यार्थी या योजनेपासून कोसो दूर राहू शकतात. एखादा गोरगरीब विद्यार्थी किंवा अभ्यासू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला तर याला जबाबदार कोण? दुर्गम भागातील उच्च प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापकांची सभा या संदर्भात घेण्यात आली का?

शासनानी करोडो रुपये खर्च करून या सुसज्ज वसतिगृहाचे नियोजन केले. पण, प्रचार प्रसाराच्या कमतरतेमुळे आणि प्रवेशासाठी चार दिवस दिल्याने गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या योजनेचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार नाही. यामुळे शिक्षणापासून अनेक विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. या वसतिगृहात वर्ग सहा ते दहावीपर्यंत प्रवेश देण्यात येत आहे.

शिक्षणाधिकारी म्हणतात,…

या वसतिगृहात 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. शेवटची तारीख 15 एप्रिल आहे याच्या प्रचार प्रसारासाठी आम्ही प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया टीव्ही नाईन मराठीला शिक्षणाधिकारी शेंडे यांनी दिली.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.