नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, पाकच्या ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; नितेश राणेंचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवरून एनसीबीला घेरलेले असतानाच भाजप नेते नितेश राणे यांनी मलिक यांच्याविरोधात आरोपांची लडी लावली आहे.

नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, पाकच्या ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर; नितेश राणेंचा गंभीर आरोप
नितेश राणे, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 3:53 PM

सिंधुदुर्ग: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवरून एनसीबीला घेरलेले असतानाच भाजप नेते नितेश राणे यांनी मलिक यांच्याविरोधात आरोपांची लडी लावली आहे. मलिक हे पाकिस्तानचे एजंट आहेत. पाकिस्तानचे जे ड्रग्ज माफिया आहेत. नवाब मलिक त्यांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. मलिक हे पाकिस्तानचे एजंट झालेले आहेत. पाकिस्तानच्या ड्रग्ज माफियांचे ते ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाले आहेत. जावयाला अटक केली म्हणून ते एनसीबीवर टीका करत आहेत. काम करणाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे हे त्यांना कळत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

बेईमान सरकार

शिवसेनेची सत्ता असताना वानखेडेला टार्गेट केलं जातं. मराठी माणसांविषयी सेनेला काहीच पडलं नाही. मुंबईमध्ये स्वतःला हिंदू बोलवून घेणं हे पाप झालं आहे, असं ते म्हणाले. ठाकरे सरकारच नाव बदलून बेईमान सरकार नाव ठेवायला हवं, असा टोलाही त्यांनी लगावला.

सामंतांच्या बंधुंची हप्ते वसुली

पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे कसे कसे आणि कोणाकडून हफ्ते घेतात हे मी अस्लम शेख यांना पत्र लिहून कळवलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. आमच्याकडे पुरावे आहेत. यासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तोडपाणी झाली नाही ना?

नियमित कर्ज भरणाऱ्या कोकणातल्या शेतकऱ्यांना 50 हजार देणार अस वचन दिलं गेलं होतं. त्यामुळे क्या हुआ तेरा वादा अस विचारावस वाटतं. मराठवाडा, विदर्भ किंवा कोकणातल्या शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न पडलाय. विरोधीपक्षात असताना हीच मंडळी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तोडफोड करून आले होते. आता तोडपाणी झाली नाही ना?, असा खोचक सवालही त्यांनी केला.

वसुलीचा एककलमी कार्यक्रम सुरू

चपट्या पायाच्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना काळी दिवाळी करण्यासाठी प्रवृत्त केलंय. ड्रग्सबद्दल बोलायचं, एनसीबी बद्दल बोलायचं, पण शेतकऱ्यांना बद्दल बोलायचं नाही. दिवसभर फक्त वसुली करायची हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आजच्या वाईट स्थितीला उद्धव ठाकरे आणि हे सरकारच जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळेच अनेक संकटे

महाराष्ट्रातला शेतकरी ठाकरे सरकार आल्यापासून अंधारात आहे. ठाकरे सरकारने त्याला अडगळीत टाकलं आहे. सरकारच्या पायगुणाबद्दल सतत महाराष्ट्रात चर्चा होते. गेल्या दोन वर्षात अनेक संकटे बळीराजावर आली, त्या शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी या ठाकरे सरकारने काय केलं? अस मला विचारावस वाटतं. विधानसभा निवडणुकीपूर्वी हेच उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना 25 हजार देणार म्हणून सांगत होते. आता मात्र शेतकऱ्यांना द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. मुख्यमंत्र्यांच्याच पायगुणामुळे राज्यावर अनेक संकटं आली, अशी टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

सोमय्या म्हणाले, राऊत कुणाचे प्रवक्ते, पवारांचे की ठाकरेंचे? आता राऊत म्हणाले, हा तर मोदींचा अपमान

VIDEO: तुमची बकबक, पकपकच तुमच्या पक्षाचा अंत केल्याशिवाय राहणार नाही; राऊतांचा सोमय्यांना इशारा

Virat Kohli Press : पाकिस्तानविरुद्धची मॅच जिंकण्यावर आमचं लक्ष, टीम इंडिया विजयासाठी सज्ज

(nitesh rane slams nawab malik over ncb action against drug peddler)

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.