AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्याकडे या, नाही तर निधी मिळणार नाही, सरपंचांना भाजपकडून दम; कोण करतंय फोन? कुणी केला आरोप?

आमच्या विचारांच्या सरपंचांनीही धमकावणाऱ्यांना जशात तसे उत्तर दिलं आहे. अजून दीड वर्ष निधी नाही दिला तरी चालेल. कारण 2024मध्ये आमचीच सत्ता येणार आहे.

आमच्याकडे या, नाही तर निधी मिळणार नाही, सरपंचांना भाजपकडून दम; कोण करतंय फोन? कुणी केला आरोप?
आमच्याकडे या, नाही तर निधी मिळणार नाही, सरपंचांना भाजपकडून दम; कोण करतंय फोन? कुणी केला आरोप? Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 21, 2022 | 1:01 PM
Share

सोलापूर: राज्यातील काही जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतीचे निकाल लागले आहेत. ग्रामपंचायत सदस्यपद आणि सरपंचपदासाठी या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर भाजप हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. मात्र, ज्या ग्रामपंचायती आपल्या हातात आल्या नाहीत, ज्या ठिकाणी इतर गटाचा किंवा पक्षाचा सरपंच झाला आहे, अशा सरपंचांना आपल्याकडे येण्यासाठी भाजपकडून दम दिला जात आहे. आमच्याकडे या नाही तर निधी मिळणार नाही, अशी धमकी भाजपकडून दिली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्याने केला आहे.

भाजपचे आमदार निधी न देण्याची भीती दाखवून ग्रामपंचायतींना आमच्याकडे येण्याबाबत फोन करून सांगत आहेत, असा गंभीर आरोप अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टींवर हा गंभीर आरोप केला आहे.

अक्कलकोटच्या जनतेने 20 पैकी 11 ग्रामपंचायती आम्हाला दिल्या आहेत. मात्र सत्तेतील लोक निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना फोन करत आहेत. आमच्या ऑफिसला या. म्हेत्रेंकडे गेलात तर निधी मिळणार नाही, अशी धमकी सत्ताधाऱ्यांकडून दिली जात असल्याचा आरोप म्हेत्रे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आमच्या विचारांच्या सरपंचांनीही धमकावणाऱ्यांना जशात तसे उत्तर दिलं आहे. अजून दीड वर्ष निधी नाही दिला तरी चालेल. कारण 2024मध्ये आमचीच सत्ता येणार आहे. तोपर्यंत आम्ही निधी वाचून राहू, असं प्रत्युत्तर आमच्या विचारांच्या सरपंचांनी धमकावणाऱ्यांना दिलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

जनतेने आमच्यावर विश्वास टाकला. आमच्या हातात ग्रामपंचायती दिल्या. जनतेने आम्हाला विकासाची संधी दिली आहे. त्यामुळे आम्ही दुप्पट वेगाने विकास करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यातील 7751 ग्रामपंचायतीचे निकाल लागले आहेत. त्यात महाविकास आघाडीला 3250 तर भाजप-शिंदे गटाच्या युतीला 3139 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीला 1523, काँग्रेसला 1001 आणि ठाकरे गटाला 726 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 2318 आणि शिंदे गटाला 821 जागा मिळाल्या आहेत. तसेच इतरांना 1362 जागा मिळाल्या आहेत.

मात्र, महाविकास आघाडी आणि अपक्षांमधील आघाडीशी संबंधित मिळून आघाडीला 4019 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच राज्यातील सर्वात मोठी आघाडी ठरली असल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.