AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघरमध्ये लॉक तोडून स्कुटीची चोरी, चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद

स्कुटी चोरुन नेत असतानाचा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी स्कुटीचे लॉक तोडून ही चोरी केली आहे. नालासोपारा पश्चिमधील छेडा नगरात हा प्रकार घडला.

पालघरमध्ये लॉक तोडून स्कुटीची चोरी, चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 12:56 AM
Share

पालघर : लॉकडाऊन काळात वसई विरार, नालासोपाऱ्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या चोरट्यांनी पार्किंमधील एक अ‌ॅक्टिव्हा स्कुटी चोरून नेल्याची घटना घडली आहे. स्कुटी चोरुन नेत असतानाचा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी स्कुटीचे लॉक तोडून ही चोरी केली आहे. नालासोपारा पश्चिमधील छेडा नगरात हा प्रकार घडला. (palghar thief steal scooty incident captured in cctv)

सकाळी उठून पाहताच स्कुटी गायब

मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा पश्चिम मधील छेडा नगरातील आनंद बिल्डिंगमध्ये एक स्कुटी ठेवण्यात आली होती. पार्किंकमध्ये स्कुटी असल्यामुळे स्कुटीचे मालक निश्चिंत होते. मात्र, दुसऱ्या दिवशी उठून पाहताच पार्किंकमधील स्कुटी गायब होती. त्यानंतर स्कुटीचालकाच्या मालकांने आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र, त्यांना स्कुटी आढळून आली नाही. त्यानंतर गाडीच्या मालकाने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

लॉक तोडून स्कुटी चोरली

तसेच स्कुटीचा शोध घेण्यासाठी त्यांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्हींची मदत घेतली. योगायोगाने चोरट्यांनी केलेली चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. सीसीटीव्हीतील दृश्यांप्रमाणे अज्ञात चोरटे स्कुटी चोरण्याच्या उद्देशाने टेहळणी करत होते. त्यांनी गाडीच्या पार्किंगवर पाळत ठेवून आजूबाजूला कोणीही नसताना स्कुटीचे लॉक तोडले. तसेच लॉक तोडून दुचाकी ढकलून बाहेर नेली. चोरीचा हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर स्कुटीच्या मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने चोरांचा शोध घेत आहेत. मात्र हा प्रकार समोर आल्यानंतर या भागात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला वाढला असल्याचे स्थानिक नागरिक म्हणत आहेत.

इतर बातम्या :

कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी ठाण्यात विशेष लसीकरण सत्र

पंतप्रधान जागतिक दहशतवादी तर गृहमंत्र्याच्या डोक्यावर 5 मिलियन डॉलरचं बक्षिस, वाचा अफगाणिस्तानचे टॉप 6 मंत्री

नागपुरात मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना फोफावला, 10 विद्यार्थांना लागण, हॉस्टेलमधील सर्वांची चाचणी होणार

(palghar thief steal scooty incident captured in cctv)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.